Rakhi Price Hike Viral Video : राखी खरेदीआधी एकदा हा व्हिडिओ नक्की बघा; काही सेकंदातच दोन रुपयांची राखी झाली ५० रुपयांना!

Shopkeeper's viral video: सध्या तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे अनेकांचं डोकंच चकरावलं आहे
Rakhi
Rakhiesakal
Updated on

राखीपौर्णिमेचा सण शनिवारी सर्वत्र साजरा होणार आहे. यानिमित्त आपल्या लाडक्या भाऊरायासाठी आपल्या आवडीची स्पेशल अन् आकर्षक राखी खरेदीसाठी महिलावर्गाची दुकानांमध्ये गर्दी होत आहे. तर बाजारपेठेतीली दुकानांमध्येही विविध आकर्षक राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. 

नेहमीप्रमाणे अगदी दोन-पाच रुपयांपासून ते शंभर-दीडशे रुपयांपर्यंतचीही राखी दुकानांमध्ये दिसून येत आहे. तर महिलावर्ग त्यांना परवडेल आणि आवडेल तशी राखी खरेदी करतान दिसत आहे. अशावेळी दुकानदरही जास्तीत जास्त ग्राहक आपल्या दुकानात यावेत, यासाठी विविध प्रयत्न करताना दिसत आहेत.

तर, राखी विक्री हा एकप्रकारे सिझनेबल धंदा असल्याने दुकानदारही जास्तीत जास्त कमाई करून घेण्यासाठी धडपडत असतात. अशावेळी राख्यांचे भाव निश्चित करताना ते विविध शक्कल लढवतात. याच पार्श्वभूमीवर आता एका राखी विक्रेत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Rakhi
Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

विशेष म्हणजे या व्हिडिओत तो राखी विक्रेता स्वत:च हे सांगतोय की, कशाप्रकारे एक अवघी दोन रुपयांची राखी ही ५० रुपयांना, १०० रुपयांना बाजारात विकली जाते. राखीची किंमत वाढण्यासाठी तिच्या आकर्षक पॅकिंगला फार महत्त्व असतं, जेवढी जास्त आकर्षक पॅकींग तेवढी त्या राखीची किंमत वाढेल, असं तो विक्रेता सांगताना दिसतो.

Rakhi
Rahul Gandhi's Allegation Fact Check : बंगळुरूमधील एका छोट्याशा घराच्या पत्यावर चक्क ८० मतदार! , राहुल गांधींच्या दाव्यात खरंच तथ्य आहे?

तर हा व्हिडिओ पाहून अनेकांचं डोकं चकरावलं आहे. आपण कशाप्रकारे मूर्खात निघतो, याचाच विचार अनेकांच्या डोक्यात आला असणार हे निश्चित. कारण, जास्तीजास्त आकर्षक राखी घेता यावी म्हणून महिलावर्ग राखीच्या किंमतीत फार घासाघीस करत नाही आणि ती दुकानदार देईल त्या किंमतीत घेत असतात. मात्र आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राखीच्या मार्केटमधील वास्तवच एकप्रकारे समोर आलं आहे, असं बोललं जात आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील व्लॉगर @jasveersinghvlogs ने शेअर केला आहे, जो तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखांच्या घरांत व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो कमेंटसही आलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com