
Virat Anushka Children Viral Video: अनेक सिलिब्रिट त्यांच्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मिडियावर चर्चेत असतात. सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली त्यांच्या मुलांसहचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरंतर त्या दोघांनीही त्यांच्या मुलांना लाईमलाइटपासून आणि पापराझींपासून दूर ठेवलं आहे.
अलिकडे विराट रोहलीने टेस्ट मॅचमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अनुष्का आणि विराट प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेले होते. त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. यात मुलगी वामिका आणि मुलगा अकाय देखील दिसत आहे. संपुर्ण कुटुंबासोबतचा व्हिडिओ समोर आला असून तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर आनंद येईल.