
नाशिकच्या येवला तालुक्यातील धामोडा गावातील एक सामान्य तरुण, भैय्या गायकवाड, आज संपूर्ण महाराष्ट्रात ‘द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष’ म्हणून गाजतोय. अवघ्या आठ दिवसांत त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या 500 वरून 40,000 वर पोहोचली आहे. त्याच्या “हॅलो, भैय्या गायकवाड बोलतोय, किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष” या रील्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पण नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? कोण आहे हा भैय्या गायकवाड, आणि त्याची ही रील का आणि कशी व्हायरल झाली? चला, जाणून घेऊया.