Viral Video: स्वच्छतेपुढे भितीनेही मानली हार! या महिलेचा व्हिडिओ पाहाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video: स्वच्छतेपुढे भितीनेही मानली हार! या महिलेचा व्हिडिओ पाहाच

आपण तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावरून खाली बघितले की आपले डोळे फिरायला लागतात. पण चौथ्या मजल्यावरील घराच्या खिडकीच्या बाहेरच्या बाजूला उभे राहून जर एखादी महिला खिडकी साफ करत असेल तर? होय, असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

दरम्यान, एका बिल्डिंगमध्ये दिवाळीची स्वच्छता करतानाचा हा व्हिडिओ आहे. जर या महिलेच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले नाही तर कुणाच्याच घरी लक्ष्मी येणार नाही अशी टॅगलाईन देऊन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. ही महिला एवढी सफाईदारपणे खिडकी साफ करत आहे की तिला त्याची भितीही वाटत नाही.

अशा वेळी आपण काळजी घ्यायला पाहिजे. कारण एवढ्या उंचीवरील घराच्या खिडकीच्या बाहेर येणे धोख्याचं असून अशा वेळी दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे असे धाडस करू नये.