Video: सूनेचा किचनमध्ये सासूसमोरच भन्नाट डान्स; सासूने काय केलं पाहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

Video: सूनेचा किचनमध्ये सासूसमोरच भन्नाट डान्स; सासूने काय केलं पाहा

सासू आणि सूनेचं कधी जमत नाही, त्यांचे सतत भांडणे होतात अशी अनेक गऱ्हाणे आपण महिलांकडून ऐकले असतील. क्वचितच असे किस्से असतात ज्या घरामध्ये सासू आणि सूनेचे भांडणे होत नाहीत. असे घर जास्त सुखी असते असं म्हटलं तरी काही हरकत नाही. अशाच सासूसुनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सून डान्स करताना दिसत आहे.

(Women Dance in Kitchen in front of her mother in law viral video)

हेही वाचा - हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक सून किचनमध्ये आपल्या सासूसमोरंच डान्स करत आहे. "तेरी लत लग गई" या व्हिडिओवर सून डान्स करत आहे तर सासूने पाहिल्यावर सासूही हसायला लागते. तर सून तिच्या जवळ जात ठुमके मारताना या व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जात आहे. तर अनेक मजेशीर कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.