Viral : माझा घटस्फोट झालाय, लग्नात काढलेल्या फोटोचे पैसे परत दे; महिलेची फोटोग्राफरकडे मागणी

महिलेने केलेली मागणी पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही.
Viral POst
Viral POst Sakal

लग्न हा सर्वांच्या आनंदाचा दिवस असतो. लग्नाची तयारी करण्यासाठी आणि आपलं लग्न व्यवस्थित पार पडण्यासाठी मोठी तयारी केली जाते. लग्नाची आधी केल्या जाणाऱ्या प्री-वेडिंग शूटसंदर्भात आपल्याला माहिती असेल. प्री-वेडिंग शूट आणि वेडिंग शूटसाठी आजकाल मोठी रक्कम मोजली जाते.

Viral POst
Viral Video : गाडी थांबवून जंगली हत्तीसमोर व्यक्तीने उंचावले हात; खवळलेल्या हत्तीने...

पण सध्या एका महिलेची व्हाट्सअप चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यामध्ये सदर महिला फोटोग्राफरला लग्नात काढलेल्या फोटोचे दिलेले पैसे परत मागताना दिसत आहे. हे ऐकून आपल्यालाही धक्का बसला असेल. पण हो. या महिलेने खरोखर आपल्या फोटोग्राफरला पैसे मागितले आहेत.

सदर महिलेने फोटोग्राफरला केलेल्या मेसेजचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. महिलेचे चार वर्षापूर्वी म्हणजे २०१९ साली लग्न झाले असून "लग्नामध्ये काढलेल्या फोटोचे पैसे आता मला परत हवेत कारण माझा आता माझ्या नवऱ्याशी घटस्फोट झाला आहे. त्यामुळे ते फोटो मला काहीच कामाचे राहिले नाहीत." असा मेसेज महिलेने केला आहे.

"पण पैसे परत देण्याची सर्विस मी देत नाही. एकदा फोटो काढले की ते परत घेता येत नाहीत आणि तब्बल चार वर्षापुर्वी काढलेल्या फोटोचे पैसे आता कसे परत देऊ शकतो मी? हे शक्य नाही" असं प्रत्युत्तर सदर महिलेला फोटोग्राफरने दिलं आहे. त्यानंतर महिलेने फोटोग्राफरला भेटण्याची विनंती केली.

Viral POst
आईच्या उपचारासाठी पैसे नव्हते! किडनी विकण्यासाठी अल्पवयीन मुलगा पोहोचला हॉस्पिटलमध्ये | Mother and Son

फोटोग्राफर भेटायला तयार नसल्यामुळे महिलेने कोर्टात जाण्याची धमकी दिली. पण फोटोग्राफर तिच्या या मेसेजवर हसला आहे. सदर फोटोग्राफरने ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करूनही हा अनुभव सांगितला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या दोघांची चॅटिंग वाचून आपल्यालाही हसू आवरणार नाही. नेटकऱ्यांनी या ट्वीटवर तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com