Viral Video: ख्रिश्चन धर्मांतरासाठी महिलेकडून खोट्या चमत्कारपत्रिका वाटप; तरूणाने केला पर्दाफाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video: ख्रिश्चन धर्मांतरासाठी महिलेकडून खोट्या चमत्कारपत्रिका वाटप; तरूणाने केला पर्दाफाश

रायपूर : छत्तीसगढ जिल्ह्यातील विलासपूर येथील एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून एक महिला ख्रिश्चन धर्मांतरासाठी खोट्या चमत्काराच्या पत्रिका वाटताना दिसत आहे. तर या महिलेचा एका व्यक्तीने पर्दाफाश केला आहे. या व्हिडिओने महिलेचे भिंग फोडले आहे.

हेही वाचा - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला पॅम्प्लेट वाटताना आपल्याला दिसत आहे. आपल्या आयुष्यात कोणतीही अडचण असली तर आपण या नंबरवर कॉल करून प्रार्थना करू शकता किंवा यामध्ये दिलेलं सर्च करून पाहू शकता. या पॅम्प्लेटवर जे आहेत ते ईश्वराचे सर्वांत मोठे दास आहेत.

तुम्ही यांना आपल्या मोबाईलमध्येही सर्च करून पाहू शकता. इथे आंधळे पाहू शकतात, लंगडे चालू लागतात आणि मेलेले सुद्धा जिवंत होऊ शकतात. हे सगळं येसूच्या संदर्भातील आहे असा दावा ही महिला या व्हिडिओत करताना दिसत आहे.

दरम्यान, या व्यक्तीने या महिलेला उलटसुलट प्रश्न विचारून तिचे भिंग फोडले आहे. ही महिला फक्त धर्मांतर करण्यासाठी हे पॅम्प्लेट वाटत असल्याचं तरूणाने या व्हिडिओत म्हटलं आहे. त्यानंतर या तरूणाने हे पॅम्प्लेट फाडून फेकले आहे. या प्रकारानंतर महिलेवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली असल्याची माहिती नाही. त्यामुळे या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :viral video