Pratik Mohite : पहली नजर का प्यार! जगातील सर्वात कमी उंचीचा बॉडी बिल्डर चढला बोहल्यावर l worlds smallest bodybuilder pratik mohite wedding photo viral see photo | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pratik Mohite wedding Photo

Pratik Mohite : पहली नजर का प्यार! जगातील सर्वात कमी उंचीचा बॉडी बिल्डर चढला बोहल्यावर

Pratik Mohite : सोशल मीडियाच्या जगात अलीकडे कुठलाही आनंदी क्षण असो किंवा धक्कादायक बातमी लगेच हवेसारखी पसरते. अलीकडे सोशल मीडियावर चर्चित विषयांपैकी एक म्हणजे प्रतिक मोहितेचं लग्न. जगातील सर्वात कमी उंचीच्या या बॉडी बिल्डरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताय. यांची लव्ह स्टोरी देखील फार फिल्मी आहे. नुकतेच प्रतिकचा विवाहसोहळा पार पडला.

जगातील सगळ्यात लहान बॉडी बिल्डर प्रतिकची उंची 3.3 फूट आहे. जगातील सर्वात तरुण आणि उंचीने लहान बॉडी बिल्डर म्हणून 28 वर्षीय प्रतीकचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. नुकताच तो विवाहबंधनात अडकला असून त्याच्या लग्नानिमित्य अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचे लग्नाचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत.

प्रतिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटलक काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडीओमध्ये प्रतिक फारच आनंदी दिसतोय. प्रतिक हा रायगडचा असून त्याची पत्नी पुण्यातील आहे. प्रतिकची उंची 3 फूट 34 इंच असून त्याची पत्नी 4.2 इंच एवढ्या उंचीची आहे.

4 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी त्याची आणि जयाची भेट घडवून आणली होती. पाहता क्षणी तो जयाच्या प्रेमात पडला होता. मात्र 4 वर्ष त्याने तिच्याशी लग्न केलं नाही. (Body)

काय होतं कारण?

प्रतिकने सांगितले की, "मी सर्वप्रथम 2018 मध्ये जयाला भेटलो होतो. मी बॉडीबिल्डींगला 2016 मध्ये सुरुवात केली. जयाला भेटलो तेव्हा मी तितकासा यशस्वी झालो नव्हतो. म्हणून आधी स्वत:च्या पायावर उभा होईल आणि मग तुझ्याशी लग्न करील असे त्याने जयाला सांगितले. हळू हळू त्याच्या मेहनतीला यश आले आणि त्याचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवल्या गेले. तो एक कुशल फिटनेस ट्रेनर बनला. त्यानंतरच त्याने जयाशी लग्न केले. " (wedding)