Year Ender 2023 : 'बहरला हा मधुमास', 'मोये मोये' ते 'जमाल कुडू'... यावर्षी कोणत्या गाण्यांवर बनले भन्नाट रील्स?

2023 मध्ये 'या' गाण्यांनी लावलं सगळ्यांना वेड; नेटकऱ्यांनी बनवले तुफान रील्स
Year Ender 2023 : 'बहरला हा मधुमास', 'मोये मोये' ते 'जमाल कुडू'... यावर्षी कोणत्या गाण्यांवर बनले भन्नाट रील्स?

भारतात टिक टॉकवर बंदी घातल्यापासून लोक इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय होऊ लागले आहेत. याचे एक कारण म्हणजे रील. इंस्टाग्रामवरील इन्फ्लुएन्सर प्रत्येक ट्रेंडला फॉलो करून वेगवेगळ्या कंटेंटवर रील तयार करतात आणि यूजर्सला ते खूप आवडते.

2023 मध्येही या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक रील दिसल्या. आता आम्ही तुम्हाला त्या व्हायरल गाण्यांबद्दल सांगतो, ज्यांचा वापर करून यावर्षी लाखो लोकांनी रील्स बनवले.

झूम जो पठाण

शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' या चित्रपटातील 'झूम जो पठाण' या टाइटल साँगचीही या वर्षी बरीच चर्चा झाली होती. या गाण्यावर लोकांनी जोरदार डान्स केला. याशिवाय युजर्सनी या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यांवरही अनेक रिल्स बनवले.

चांद बालियां

2023 मध्ये अनेक गाण्यांसोबतच 'चांद बलियां' हे गाणे देखील होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या गाण्यावर रील्स बनवले आहेत आणि या गाण्यावर 1 दशलक्षाहून अधिक रील्स बनवण्यात आल्या आहेत.

ऑब्सेस्ड

यावर्षी तुम्ही पंजाबी गायक रियार साबचे 'ऑब्सेस्ड' गाणे ऐकले असेलच. हे गाने इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल झाले जेव्हा अभिनेता विकी कौशलने त्यावर डान्स केला आणि व्हिडिओ बनवला. त्यानंतर ते सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाले आणि लाखो लोकांनी त्यावर रील्स बनवून शेअर केले.

फिर और क्या चाहिए

या वर्षी रिलीज झालेल्या विकी कौशल आणि सारा अली खान स्टारर चित्रपट 'जरा हटके जरा बचके' मधले 'फिर और क्या चाहिये' हे गाणेही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या गाण्यावरही हजारो-लाखो लोकांनी रील्स केले. 'फिर और क्या चाहिये' व्यतिरिक्त याच चित्रपटातील 'तेरे वास्ते फलक से मैं चांद लाऊंगा' या गाण्यावरही अनेक रील बनवण्यात आली होती.

गुलाबी शरारा

सुमारे तीन महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या उत्तराखंडमधील 'गुलाबी शरारा' या पहाडी गाण्याने सोशल मीडियावर ज्या प्रकारे धुमाकूळ घातला आहे ते पाहून आश्चर्य वाटले. इंस्टाग्रामवर 1 दशलक्षाहून अधिक लोकांनी या गाण्यावर डान्सचे रील बनवले आणि शेअर केले.

राम आएंगे तो अंगना सजाऊंगी

नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या आसपास रिल्ससाठी सर्वात जास्त वापरले गेलेले गाणे म्हणजे 'राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी'. हे गाणे गायिका स्वाती मिश्राने गायले आहे.

मोये मोये

अलीकडे, इंस्टाग्रामवर सर्वात व्हायरल रील 'मोये मोये' आहे. या वर्षी, दिल्ली पोलिसांपासून सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर आणि अगदी बॉलीवूड सेलिब्रिटींनीही मोये-मोये वर रील बनवली. आम्ही तुम्हाला सांगतो की, 'मोये मोये' हा सर्बियन म्युझिक व्हिडिओ Dzanum मधून घेतला आहे. हे सर्बियन गायक तेजा डोरा हिने गायले आहे. यासोबतच व्हायरल झालेल्या गाण्याचे बोल 'मोये मोये' नसून 'मोये मोर' आहेत.

बहरला हा मधुमास

'महाराष्ट्र शाहीर' या मराठी चित्रपटातील 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्याने नेटकऱ्यांना भुरळ पाडलेली. यावर रील बनवणाऱ्या नेटकऱ्यांची संख्या प्रचंड होती.

अर्जन व्हॅली

डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल' चित्रपटातील 'अर्जन व्हॅली' हे गाणे खूप व्हायरल झाले आहे. या गाण्यावर लोक जबरदस्त रिल्स बनवत आहेत.

दुनिया जला देंगे

बी प्राकने रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील 'दुनिया जला देंगे' हे गाणे गायले आहे. या गाण्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. लोक या इमोशनल गाण्यावर रिल बनवताना दिसत आहेत.

जमाल कुडू

जर मोये मोयेसोबतचे कोणतेही गाणे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक रीलमध्ये पाहिले जात असेल तर ते 'अॅनिमल'मधील जमाल कुडू हे गाणे आहे. सध्या हे गाणे रीलच्या जगात टॉप ट्रेंडिंग आहे.

बादल बरसा बिजूली

आनंदा कारकी यांनी गायलेल्या 'बादल बरसा बिजुली' या गाण्याने रील मध्ये नवे रेकॉर्ड केले होते. या गाण्याच्या स्टेप्स सगळ्यांना प्रचंड आवडल्या.

सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक ए वॉव

'सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक ए वॉव' हे रील म्हणणाऱ्या जास्मिन कौरने रीलच्या दुनियेत खळबळ उडवून दिली आहे. अनेक सेलिब्रिटींनी ही रील बनवली आहेत. ही रील कधी व्हायरल झाली ते कळलेच नाही. या रीलवर दीपिका पदुकोणनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com