youth buried in pit
youth buried in pitESakal

Viral Video: घरात खड्डा खोदला, नंतर तरुणानं स्वत:लाच पुरलं, नंतर जे घडलं त्यानं... व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

Viral Video: तरुणाने स्वत:लाच खड्ड्यात पुरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. पाहा पोस्ट...
Published on

सध्याचे जग हे आधुनिक आणि तंत्रज्ञानाचे जग आहे. त्यातच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात लोक व्हायरल होण्यासाठी कोणत्या थराला जातील हे सांगणं कठीणच आहे. व्हायरल होण्यासाठी अनेक व्हिडिओ बनवले जातात. सध्या सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो तुम्हाला थक्क करण्यासाठी पुरेसा आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने स्वत:लाच एका खड्ड्यात पुरल्याचे पाहायला मिळत आहे.

youth buried in pit
Viral Video: व्होल्वो बसचा कहर! अचानक ब्रेक निकामी, चालकाचं नियंत्रण सुटलं, वाहनांना धडक अन्... थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने त्याच्या घरात खड्डा खोदल्याचे दिसत आहे. त्याच्या शेजारी एक स्त्री आणि पुरुष हात जोडून बसले आहेत. खड्ड्यातून माती काढल्यानंतर ती व्यक्ती तोंडाला कापड बांधते. यानंतर तो त्या खड्ड्यात आपले अर्धे शरीर घेऊन झोपल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर, दुसरा पुरुष आणि स्त्री त्यावर माती टाकता. मातीत अर्धा गाडल्यानंतर ती व्यक्ती आणि इतर दोन लोक हात जोडून बसलेले दिसत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक लोक त्यांच्या प्रतिक्रिया देत आहे. काही लोक हा वेडेपणा असल्याचे सांगत आहेत तर काही लोक त्या व्यक्तीने केलेल्या कृतीचे कौतुक करत आहे. हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर @Gaitondu नावाच्या खात्यावर शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे, 'काय मजबुरी असू शकते?' हा व्हिडिओ ४ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले - हे काय आहे, तो वेगळ्याच नशेत आहे. आणखी एका यूजरने लिहिले- इंटरनेटने मला वेड लावले आहे. तिसऱ्या युजरने लिहिले - लाईक्स येत नसतील. एका यूजरने लिहिले - असे करणे मूर्खपणाचे आहे. मात्र असे व्हिडिओ करणं हे जीवाशी खेळण्यासारखे आहे. जास्त लाइक्स आणि व्ह्युज मिळवण्यासाठी असे व्हिडिओ करु नका असं विविध स्तरातून सांगण्यात येतं. मात्र काही लोक सोशल मीडियाच्या आहारी जाऊन असे व्हिडिओ बनवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com