
Viral Video : परदेशी पोलिसांनी भारतीय बायकांसोबत धरला ठेका, नेटकरी म्हणाले हा भारत असता तर?
सोशल मीडियावर सतत काहीना काही व्हायरल होत असतं सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही महिला नाचत आहेत आणि त्यांच्यासोबत गणवेशधारी पोलीसही नाचत आहेत.
हा व्हिडिओ न्यूझीलंडचा असल्याचे सांगण्यात येत असून पोलिस कर्मचारीही न्यूझीलंडचेच आहेत. हा व्हिडिओ लोकांकडून पसंत केला जात आहे. व्हिडिओ शेअर करून काही लोक असा प्रश्न विचारत आहेत की जर गणवेशातील भारतीय पोलिसाने असा डान्स केला असता तर त्याचे काय झाले असते?
हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
अरुण बोथरा यांनी व्हिडिओ शेअर केला आहे
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये न्यूझीलंडमधील गणवेशधारी पोलिस एका पान शॉपच्या उद्घाटनानंतर एका बॉलिवुड चित्रपटातील गाण्यावर भारतीय महिलांसोबत नाचताना दिसत आहेत.बोथरा यांनी आपल्या देशात असे घडले तर लोकांची प्रतिक्रिया काय असेल? असा प्रश्न विचारला आहे. सोशल मीडियावर लोक यावर कमेंट करून आपली मते मांडत आहेत.
हेही वाचा: Sharad Pawar News : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही धर्मवीर, मग...; शरद पवारांचं सूचक विधान
उत्तर प्रदेश मधील पोलिसांसह इतर अनेक राज्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तपास आणि कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे प्रकार भारतात घडले आहेत. एवढेच नाही तर ड्युटीवर असताना काही पोलिसांचे डान्स करतानाचे व्हिडिओ शेअर करणाऱ्या पोलिसांनाव काही लोकांनी कारवाईची मागणीही केली आहे. यापूर्वी अशाच बऱ्याच घटना समोर आल्या आहेत.
हेही वाचा: Doctors strike : निवासी डॉक्टरांचा संप मागे; महाजन म्हणाले दोन दिवसात भरणार १ हजार ४३२ पदं भरणार