Viral Video : 'सपने में मिलती है'; लग्न हॉलच्या बाहेर झोमॅटो डिलीवरी बॉयचा डान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral Video : 'सपने में मिलती है'; लग्न हॉलच्या बाहेर झोमॅटो डिलीवरी बॉयचा डान्स

लग्न म्हणजे सर्वांच्या आनंदाचा विषय असतो. सर्वजण लग्नात डान्स करण्यासाठी उत्सुक असतात. त्यात जर आपल्या जवळच्या व्यक्तीचे लग्न असेल तर मग विषयच सोडा. पण सध्या एका लग्न हॉलच्या बाहेर झोमॅटो डिलीवरी बॉयच्या डान्सचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हा व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल होत असून एका लग्नाच्या हॉलमध्ये गाण्यावर पाहुणे मंडळी डान्स करत आहेत. त्यामध्ये पुरूष आणि महिलांचा सामावेश आहे. पण त्याच गाण्याच्या डान्सवर बाहेरील एक डिलीवरी बॉय डान्स करताना या व्हिडिओत दिसत आहे. त्याच्या अंगावर झोमॅटोचा शर्ट असून खांद्यावर बॅग लटकवलेली दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक भावनिक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, सपने में मिलती है या गाण्यावर या मुलाने भन्नाट डान्स केला आहे. लग्नाच्या हॉलमध्ये असलेल्या पाहुणे मंडळीतील एका व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे. तर काचेतून बाहेर बघितल्यावर हा मुलगा डान्स करताना दिसत आहे.