श्रेष्ठ अशा रक्‍तदानाचे वाढावे प्रमाण! 

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 1 October 2019

रक्तदान करणे माणुसकीचे खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे. मात्र केवळ गैरसमजांमुळे रक्‍तदानाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे बघायला मिळत नाही. रक्तदानाने अशक्तपणा येतो. काहीतरी आजार होईल, किंवा अन्य काही गैरसमज बाळगले जातात. खरे तर रक्तदान करताना शरीरास कोणतीही इजा होत नाही, किंवा त्यांचे काही दुष्परिणामही नाहीत. दरम्यान रक्तदानासाठी काही निकषदेखील आहेत.

नाशिक : माणसाच्या आयुष्यातला सर्वांत मोठा दानधर्म म्हणजे रक्तदान असे म्हटले जाते. अपघात किंवा अन्य विविध कारणांमुळे रूग्णांना रक्‍तपिशवीची आवश्‍यकता भासले. विविध स्तरावरील संस्था व वैयक्‍तिक दात्यांच्या सहकार्याने रक्‍तपेढ्यांकडून रक्‍त संकलीत केले जात असले तरी सद्य स्थितीत मागणीपेक्षा उपलब्धता कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. रक्‍तदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आणखी दात्यांनी पुढे येण्याची अपेक्षा यानिमित्त व्यक्‍त होत आहे. 

रक्‍तदानाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे दिसत नाही
राष्‍ट्रीय स्‍वैच्छिक रक्‍तदान दिवस सर्वप्रथम 1 ऑक्‍टोबर 1975 मध्‍ये साजरा करण्‍यात आला तेव्‍हापासून दरवर्षी आपण हा  दिवस साजरा करत असतो. रक्तदान करणे माणुसकीचे खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे. मात्र केवळ गैरसमजांमुळे रक्‍तदानाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे बघायला मिळत नाही. रक्तदानाने अशक्तपणा येतो. काहीतरी आजार होईल, किंवा अन्य काही गैरसमज बाळगले जातात. खरे तर रक्तदान करताना शरीरास कोणतीही इजा होत नाही, किंवा त्यांचे काही दुष्परिणामही नाहीत. दरम्यान रक्तदानासाठी काही निकषदेखील आहेत.

एक सजग नागरिक म्हणून रक्तदान केले पाहिजे

दात्याचे वय अठरा ते पासष्ट वर्षे असावे. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला कुठलाही संसर्गजन्य आजार नसावा. साधारणतः प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात पाच लिटर रक्त असते. रक्तदानात केवळ साडेतीनशे मिली एवढेच रक्त घेतले जाते. रक्तदान म्हणून प्रचार आणि प्रसार जरी झाला असला तरी मुळात रक्तदात्यांची संख्या खूप कमी आहे. आपण कितीही प्रगत असलो तरी कुणालाही कृत्रिम रक्त तयार करता आलेले नाही. अपघातातील रूग्ण, प्रसुतीकाळ, अतिदक्षता विभाग यांना जास्त प्रमाणात रक्त लागते. त्यांना वेळेवर रक्त मिळाले नाही तर मृत्यूदेखील होऊ शकतो. यासाठी सर्वांनी एक सजग नागरिक म्हणून रक्तदान केले पाहिजे.

रक्तदान हेच जीवनदान...

रक्तदानाविषयी विचार केला असता रक्तदान हे जीवनदान आहे. सर्वांनी रक्तदानाचे महत्व समजायला हवे. कारण आपण दिलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो. कधी तरी आपल्या कुटुंबातील व्यक्तीलाही याचा फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे तरूण वर्गाने सामाजिक बांधिलकी जोपासत नियमित रक्तदान करणे गरजेचे आहे. काही तरूणांमध्ये जागृकता आहे, मात्र सध्याचा रक्तपेढीचा साठा बघता आणि लोकसंख्या पाहता रक्तदानाचे प्रमाण नगण्य आहे. यामुळे खासगी दवाखान्यात रक्त जास्त किंमतीमध्ये दिले जाते. रक्त पिशवी 1480 रूपये ते त्यातील योग्य ते कमी-जास्त घटक एकत्रित करून तपासणी 2300 रूपयांनी देखील दिले जाते. ज्या रक्तदात्याने दोन ते तीन वेळा रक्तदान केले आहे, त्या काही प्रमाणात सूट दिली जाते. शहरातील निगेटिव्ह रक्तसाठ्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करणे गरजेचे आहे. 

सध्याचा शिल्लक रक्‍तसाठा
गट साठा (अर्पण रक्तपेढी) 

A positive 107 
A Negetive 07 
AB positive 56 
AB Negetive 04 
B positive 217 
B Negetive 10 
O positive 207 
O Negetive 04 

संजीवनी रक्तपेढी 
A positive 18 
A Negetive 02 
AB positive 22 
AB Negetive 01 
B positive 68 
B Negetive 00 
O positive 46 
O Negetive 09 

जनकल्याण रक्तपेढी 
A positive 45 
A Negetive 01 
AB positive 12 
AB Negetive 02 
B positive 62 
B Negetive 04 
O positive 12 
O Negetive 00 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blood donation ratio should be Increase