गणरायाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

चार दिवसांवर उत्सव; मूर्तिकार, मंडळांचीही लगबग वाढली
जळगाव - गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...अशी आर्त हाक देत गतवर्षी गणरायाला निरोप दिल्यानंतर गणेशोत्सवाची वाट बघणाऱ्या भक्‍तांचा लाडक्‍या बाप्पाचा उत्सव अवघ्या चार दिवसांवर आला आहे.

गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी भाविकही तयारीला लागलेत. अगदी मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांपासून गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि घरात चिमुकली मंडळी देखील तयारीत गुंतले आहेत. मूर्तिकार शेवटचा हात फिरविण्यात मग्न आहेत; तर मंडळाचे सभामंडप उभारणीच्या कामांना वेग आल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.

घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीगणेशाचे २५ ऑगस्टला वाजतगाजत आगमन होणार असल्याने सर्वत्र तयारी सुरू आहे. ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा करण्याची तयारी प्रामुख्याने मोठ्या मंडळांची सुरू आहे. स्थापनेसाठी सभा मंडप आणि सजावटीचे कामाने वेग घेतला आहे. मोठमोठ्या मंडळांकडून रात्रंदिवस सजावटीचे काम सुरू आहे. 

मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात 
गणेशमूर्ती बनविण्याचे काम गेल्या एक- दीड महिन्यांपासून सुरू आहे. बहुतांश गणेशमूर्ती तयार होऊन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत, मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. रात्री उशिरापर्यंत कारागिरांकडून मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहेत. शहरासह बाहेरगावातील मंडळांकडून मूर्तीची नोंदणीही होताना दिसत आहे. काही मंडळांद्वारे महिन्यापूर्वीच नोंदणी झाली आहे. तर काही मंडळांकडून तयार झालेली मूर्ती आतापासूनच नेण्यात येत आहे.

कार्यकर्त्यांचीही धावपळ वाढली
बाप्पाच्या आगमनाची सर्वांना ओढ लागली असून, स्वागतासाठी सारेचजण तयारीला लागले आहेत. यात सर्वांत जास्त लगबग ही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची वाढलेली पाहण्यास मिळत आहे. भाविकांना आकर्षित करण्यासाठी साकारण्यात येत असलेल्या आरासचे काम पूर्ण करण्यात कारागीर देखील व्यस्त आहेत. शिवाय, दहा दिवसांच्या उत्सवात लागणाऱ्या साऱ्या वस्तूंची जमवाजमव करणे; भटजी, मंडप, साऊंड सिस्टिम याचे बुकिंग यापूर्वीच झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgav news ganeshotsav preparation final step

टॅग्स