स्मार्ट प्रकल्प वाढीव खर्चाचा भार नाशिककरांच्या माथी! 

smart city nashik.jpg
smart city nashik.jpg

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांच्या किमती वाढल्याची बाब समोर आली आहे. यापूर्वी प्रकल्पांच्या प्रस्तावित किंमती व्यतिरिक्त 125 कोटी 66 लाख रुपये अतिरिक्त खर्चाचा भार नाशिककरांच्या माथी बसणार आहे. 

प्रकल्पांच्या किंमती प्रस्तावित किंमतीपेक्षा वाढल्याची बाब समोर

प्रकल्पांची व्यवहार्यता न तपासता नाशिककरांवर प्रकल्प लादले गेलेच, शिवाय आता या प्रकल्पांचा अतिरिक्त आर्थिक खर्चाचा भार टाकण्याची तयारी स्मार्टसिटी कंपनीने सुरू केली आहे. स्मार्टसिटी अंतर्गत एकूण 52 प्रकल्प असून, त्यातील विद्युत दाहिनी, महात्मा फुले कलादालन, महाकवी कालिदास कलामंदिर, नेहरू उद्यान नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृह, महापालिकेच्या सोळा इमारतींवर सोलर पॅनल बसविणे, अहिल्यादेवी होळकर पुलाखाली स्वयंचलित गेट 
बसविणे व नगरपरियोजना हे प्रकल्प सध्या कार्यान्वित आहेत. पूर्ण झालेले, प्रस्तावित व अद्याप कार्यान्वित होणाऱ्या प्रकल्पांच्या किमतींबाबत सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी स्मार्टसिटी कंपनीकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. त्यात प्रकल्पांच्या किमती प्रस्तावित किंमतीपेक्षा वाढल्याची बाब समोर आली आहे. सुरू असलेल्या नऊ प्रकल्पांच्या किमतीतून 125.66 कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार नाशिककरांना येत्या काळात सहन करावा लागणार आहे. 

वाढता - वाढता वाढे खर्च 

अमरधाममध्ये बसविलेल्या इलेक्‍ट्रिक विद्युत दाहिनीसाठी 2.25 खर्च प्रस्तावित होता. त्यात आठ लाख रुपये वाढविण्यात आले. महात्मा फुले कलादालन नूतनीकरणाचा खर्च 1.12 कोटी प्रस्तावित होता. परंतु काम पूर्ण होत असताना 3.70 कोटींची देयके अदा करण्यात आली. अतिरिक्त 2.58 कोटींचा खर्च कोठे व कसा केला, याचे उत्तर स्मार्टसिटी कंपनीकडून मिळाले नाही. नेहरू उद्यान दुरुस्तीचा मूळ प्रस्ताव 45 लाखांचा होता. त्यात 87 लाखांनी वाढ करण्यात आली. महाकवी कालिदास कलामंदिर नूतनीकरणासाठी 5.64 कोटींचा खर्च प्रस्तावित असताना 4.32 कोटी अतिरिक्त म्हणजे एकूण 9.96 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार

पलुस्कर ऑडिटोरिअमचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी 2.25 कोटी रुपये प्रस्तावित असताना नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अतिरिक्त 14 लाख म्हणजेच 2.39 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. कमांड कंट्रोल सेंटरसाठी 22.5 कोटी रुपये खर्च प्रस्तावित असताना सद्यःस्थितीत 56.94 कोटी रुपये खर्च 
दर्शविला असून, 33.44 कोटी रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. होळकर पुलाखाली स्वयंचलित गेट बसविण्यासाठी 19.19 कोटी रुपये खर्च प्रस्तावित असतांना तो खर्च 26 कोटींपर्यंत वाढविण्यात आला. नगरपरियोजनेसाठी 132.17 कोटी रुपये प्रस्तावित असताना आता तो खर्च 209.59 कोटींपर्यंत दर्शविला आहे. त्यापूर्वी स्मार्ट रस्त्यासाठी अतिरिक्त सुमारे सव्वादोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com