esakal | नियती झाली क्रूर! आई..'सगळं सुख तुझ्या पायाशी आणेल मी"...म्हणणारा मुलगा तिच्यासमोर प्राण सोडतो तेव्हा
sakal

बोलून बातमी शोधा

worker death.jpg

तालुक्यातील येथे सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर देखरेखीसाठी असलेल्या 20 वर्षीय युवकाचा ग्राइंडर मशिनखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 29) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.

नियती झाली क्रूर! आई..'सगळं सुख तुझ्या पायाशी आणेल मी"...म्हणणारा मुलगा तिच्यासमोर प्राण सोडतो तेव्हा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (सिन्नर) घरात तो एकटाच कमवणारा...काम केले तरच खायला येणार अशीच घरची परिस्थिती. त्यात असा काळाचा घाला आला की, आई वडीलांच्या म्हातारपणाचा आधारच हिरावला.  ही ह्रदयद्रावक घटना आहे सिन्नर तालुक्यातील कामासाठी जाणं ठरलं त्याचं शेवटचं.  

अशी आहे घटना

जनार्दन भास्कर लगड (वय 20, रा शिंगणापूर) कोपरगाव हा युवक समृद्धी महामार्गाच्या कामावर दिलीप बिल्डकॉनमध्ये कार्यरत होता. रात्री काम सुरू असताना ग्राइंडर मशीनचा धक्का लागून तो चाकाखाली सापडला. मशीनमागे घेत असताना चालकाच्या लक्षात न आल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर सहकाऱ्यांनी व परिसरातील ग्रामस्थांनी जखमी अवस्थेतील जनार्दनला दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. संतोष कुरहे यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा > नाशिककरांनी पुन्हा अनुभवला 'तोच' कानठळ्या बसवणारा आवाज...पण यावेळी कारण?

२ लाख आपत्कालीन सहाय्य

अपघातात मृत पावलेल्या जनार्दनच्या पश्चात आई वडील असून घरात तो एकटाच कमवता होता. या प्रसंगात त्याच्या कुटूंबियांना आपत्कालीन सहाय्य म्हणून दिलीप बिल्डकॉनच्या वतीने 2 लाखाची मदत करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसात त्याच्या आई वडिलांच्या नावे प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश दिला जाईल. तसेच 25 लाखाच्या अपघात विम्याची देखील लाभ देण्यात येईल अशी माहिती दिलीप बिल्डकॉन चे उपव्यवस्थापक सुनील तोमर यांनी सांगितले.

हेही वाचा > "वेड्या मनाला लागलीय घरी परतण्याची आस!" लॉकडाऊनमध्ये 'त्यांचा' टाहो ह्रदयस्पर्शी