नाशिक तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर

srpancha arakshan.jpg
srpancha arakshan.jpg

नाशिक : नाशिक तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण गुरुवारी (ता. 28) जाहीर झाले. त्यात, १९९५ पासून २०२० पर्यंत चक्राकार पध्दतीने मागासवर्गीयांचे आरक्षण न पडलेल्या ग्रामपंचायतीत सरपंच पदाचे आरक्षणाचे रोटेशन काढून त्यानुसार सोडत काढण्यात आली. ३४ पैकी अनुसुचित जाती ३, अनुसुचित जमाती ४ आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ९ याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले. 


नाशिक तालुक्याचे तहसिलदार अनिल दौडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयाच्या आवारात गुरुवारी (ता. 28) सकाळी अकराला बिगर अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीसाठी सोडत निघाली. त्यात, तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात, बिगर अनुसुचित जातीच्या ३ जागांसाठी १९९५ ते २०२० पर्यंत अनुसुचित जाती (एससी) आरक्षण न पडलेल्या तीन ग्रामपंचायती निवडण्यात आल्या. याच पध्दतीने अनुसुचित जमातीच्या ४ जागांसाठी १९९५ ते २०२० पर्यंत आरक्षण न पडलेल्या ग्रामपंचायतीतून ४ ग्रामपंचायतीच्या सोडती काढण्यात आल्या. 

 इतर मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी चूरस

नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी चूरस होती. तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायतीचे चक्राकार पध्दतीने नाव काढतांना १९९५ ते २०२० पर्यंत इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण पडून झालेल्या ग्रामपंचायतीत १८ ग्रामपंचायती निवडतांना अखेरच्या ग्रामपंचायतीसाठी शेवगेदारणा आणि मातोरी या दोन गावात सोडत निघाली. त्यात अंतिम क्षणी शेवगेदारणा गावाच्या सोडतीचे आरक्षण निघाले. 

असे आरक्षण 

अनुसुचित जाती (एससी) - संसरी, माडसांगवी, बेलतगव्हाण, (३ गाव), अनुसुचित जमाती - लहवित, कोटमगाव, शिलापूर, चांदगिरी (४ गाव), नागरिकांचा मागासांचा प्रवर्ग - एकलहरे, मोहगाव, विंचूरगवळी, हिंगणवेढे, पिंप्रीसैय्यद, लाखलगाव, कालवी, शेवगेदारणा, रायगडनगर (९ गाव), सर्वसाधारण गटासाठी आरक्षण पडलेली गाव - सामनगाव, यशवंतनगर, बेलगाव ढगा, विल्होळी, शिंदे, गौळाणे, लोहशिंगवे, ओढा, राहूरी,जाखोरी, पळसे, मातोरी, आंबेबहुला, मुंगसरे, वंजारवाडी, नाणेगाव, दोनवाडे, तिरडशेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com