विनाकारण फिरणाऱ्यांनो सावधान... दीड हजार नागरिकांविरुद्ध कारवाई

police action.JPG
police action.JPG
Updated on

नाशिक : मंगळवार (ता. 30)पासून सायंकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू आहे. दिवसाही नागरिकांनी मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे, दुचाकीवर डबलसिट प्रवास न करणे यांसारख्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्याचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी दोन दिवसांमध्ये नाकाबंदी करीत बेशिस्त नागरिकांवर कारवाई केली.

त्यानुसार परिमंडळ एकमध्ये पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका आणि गंगापूर, तर परिमंडळ दोनमध्ये सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, देवळाली कॅम्प, नाशिक रोड या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कारवाईचा बडगा उगारला. परिमंडळ एकमध्ये सुमारे साडेआठशे नागरिकांवर कारवाई केली असून, 25 दुचाकी आणि 17 चारचाकी वाहने जप्त केली. परिमंडळ दोनमध्ये अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिक रोड व देवळाली कॅम्पच्या हद्दीत सुमारे साडेसहाशे नागरिकांवर कारवाई करण्यात आली. डबलसिट दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सुमारे अडीचशे चालकांवर कारवाई केली. 

रॅश ड्रायव्हर्सची डोकेदुखी 
लॉकडाउनमध्ये पूर्वीपेक्षा शिथिलता आहे. काही बेशिस्त तरुणाईकडून रस्त्यांवरून रॅश ड्रायव्हिंग केली जात आहे. एकीकडे पोलिस डबलसिटविरोधात दंडात्मक कारवाई करीत असताना रॅश ड्रायव्हिंग करणारे बिनबोभाटपणे रात्री-अपरात्री ड्रायव्हिंग करीत आहेत. त्यांच्यावर आळा घालून गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वसामान्य करीत आहेत. 

रिक्षांचालकांची सावधगिरी 
रिक्षांमध्ये दोनपेक्षा अधिक प्रवासी न बसविण्याच्या सूचना आहेत. उपनगरीय रस्त्यावर या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. शहराच्या मुख्य रस्त्यांवर चालणाऱ्या वाहनचालकांकडून त्याचे पालन होत असतानाच, काही रिक्षाचालकांनी चालक आणि प्रवासी यांच्यातील आसनव्यवस्थेत एक प्लॅस्टिकचे कव्हर बांधले आहे. जेणेकरून पाठीमागे बसलेल्या प्रवाशापासून होणाऱ्या संसर्गापासून रिक्षाचालकाला बचाव करता येतो. त्यानुसार, रिक्षाचालकांनी प्लॅस्टिक वा कापड लावून घेतल्याचे दिसून येते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com