video : 'उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणुक खपवून घेतली जाणार नाही' - प्रताप दिघावकर

विनोद बेदरकर
Wednesday, 9 September 2020

शेतकऱ्यांचा माल घेऊन त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांना 8 दिवसाची मुदत देऊन पैसे दिले तर ठीक अन्यथा त्वरित कारवाई केली जाईल. त्यासाठी कुणीही शेतकरी मला थेट मोबाईलवर संपर्क साधू शकतो असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी बुधवारी (ता. 9) रोजी पत्रकार परिषदेत केले.

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे फसवणुकीचे प्रकार जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल घेऊन त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांना 8 दिवसाची मुदत देऊन पैसे दिले तर ठीक अन्यथा त्वरित कारवाई केली जाईल. त्यासाठी कुणीही शेतकरी मला थेट मोबाईलवर संपर्क साधू शकतो असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी बुधवारी (ता. 9) रोजी पत्रकार परिषदेत केले.

संपर्क साधण्याचे आवाहन

शेतकरी फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून योग्य तो न्याय नक्की मिळणार. तसेच मला भेटायचं असेल तर विना अपॉइंटमेंट भेटा. भेटण्याची वेळ सकाळी 10.30 ते 6 वाजेपर्यंत आहे. मला भेटू शकता अथवा थेट माझ्या  9773149999 या मोबाईल क्रमांकावर केव्हाही फोन करा. असे श्री दिघावकर यांनी आवाहन केले आहे. 

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action will be taken against those who cheat farmers - Pratap Dighavkar nashik marathi news