वावीत विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

अजित देसाई 
Wednesday, 23 September 2020

सिन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. सुदैवाने ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक आरोग्य विभागानने योग्य नियोजन केले वावी गावात लोकांची वाढती वर्दळ असतानाही परिस्थिती नियंत्रणात आहे. असे असले तरी आता  लोकांकडून सामाजिक अंतराचे पालन करणे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नाशिक/सिन्नर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांवर आज (दि.23) वावी ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. गावात विनामास्क फिरणाऱ्या 19 जणांकडून प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे दंडवसुली करून पुन्हा विनामास्क न फिरण्याची तंबी देण्यात आली.

गावपातळीवर मोहीम

सिन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. सुदैवाने ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक आरोग्य विभागानने योग्य नियोजन केले वावी गावात लोकांची वाढती वर्दळ असतानाही परिस्थिती नियंत्रणात आहे. असे असले तरी आता  लोकांकडून सामाजिक अंतराचे पालन करणे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आपण आपले रक्षक ही मोहीम गावपातळीवर राबवली जात आहे.असे असताना स्वतःच्या आरोग्याविषयी निष्काळजीपणा दाखवत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांविरोधत दंडात्मक कारवाई करत आज (दि.23) ग्रामपंचायत प्रशासनाने तीन हजार 800 रुपयांची दंड वसुली केली. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या सूचनेवरून ग्रामविकास अधिकारी परेश जाधव, लिपिक संदीप सरवार, नारायण गोराणे, कर्मचारी तात्या वरपे यांनी ही कारवाई केली. रस्त्यावरून विनामास्क जाणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे वावरत इतरांच्या आरोग्यास अपाय करणाऱ्या 19 जणांकडून प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. पुन्हा विनामास्क न फिरण्याची तंबी देखील यावेळी संबंधितांना देण्यात आली.

शासनाने लॉकडाऊन नियमांत शिथिलता देत विस्कळीत झालेले अर्थकारण पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, लोकांडून याचा चुकीचा अर्थ घेतला जात असून कोरोना संसर्गाची भीती बाळगली जात नाही. यामुळे आजार बाळावण्याची शक्यता अधिक आहे. कामाशिवाय घराबाहेर पडणे चुकीचे असून सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक असून दुकानात येणाऱ्या ग्राहकांना त्याशिवाय प्रवेश देऊ नये.    परेश जाधव, ग्रामविकास अधिकारी

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action on without masked walkers in vavi nashik marathi news