'त्या' दोन नगरसेवकांच्या गुंडांचा धक्कादायक कारनामा! अपघाताच्या घटनास्थळीच पोलीसांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

एक्‍स्लो पॉइंट येथे रात्री अपघात झाला. त्यामुळे घटनास्थळी गर्दी झाली होती.पोलिस ठाण्याचे रात्रीचे बीटमार्शल गावित व होमगार्ड तेथे पोचले. ते वाहने बाजूला करीत असताना, त्यातील एक कार नगरसेवकाच्या भावाची होती. त्याने फोन करून काही तरुणांना घटनास्थळी बोलावले..अन् मग केला असा कारनामा

नाशिक : रात्री अपघात झाला. त्यामुळे घटनास्थळी गर्दी झाली होती.पोलिस ठाण्याचे रात्रीचे बीटमार्शल गावित व होमगार्ड तेथे पोचले. ते वाहने बाजूला करीत असताना, त्यातील एक कार नगरसेवकाच्या भावाची होती. त्याने फोन करून काही तरुणांना घटनास्थळी बोलावले..अन् मग केला असा कारनामा

नेमके काय घडले?

एक्‍स्लो पॉइंट येथे रात्री अपघात झाला. त्यामुळे घटनास्थळी गर्दी झाली होती. अंबड पोलिस ठाण्याचे रात्रीचे बीटमार्शल गावित व होमगार्ड तेथे पोचले. ते वाहने बाजूला करीत असताना, त्यातील एक कार नगरसेवक आरोटे यांचा भाऊ अमित आरोटे याची होती. त्याने फोनकरून काही तरुणांना घटनास्थळी बोलावले. नगरसेवक भागवत आरोटे, राकेश दोंदे, अमित आरोटे यांच्यासह आठ-दहा जणांनी पोलिस कर्मचारी गावित व होमगार्डला मारहाण सुरू केली, तसेच काहींनी गावित यांचा गळा दाबून ठार करण्याचा प्रयत्न केला. माहिती कळताच आणखी पोलिस घटनास्थळी पोचताच संशयित पळून गेले. 

गुन्हा दाखल

भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राकेश दोंदे, तर शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे यांच्यासह त्यांच्या काही गुंडांनी अंबड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना रविवारी (ता. 28) रात्री उशिरा घडली. नगरसेवक दोंदे व अमित आरोटे यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून, नगरसेवक आरोटे फरारी झाले असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी अमित आरोटे, राकेश दोंदे व शर्मा या तिघांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरा अंबड पोलिसांत प्राणघातक हल्ला, सरकारी कामात अडथळा, गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाले

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assault on police at nashik marathi news