esakal | तीन वर्षांत 'इतक्या' व्यावसायिक महाविद्यालयांना टाळे!...धक्कादायक वास्तव
sakal

बोलून बातमी शोधा

college student.jpg

मात्र, व्यावसायिक शिक्षणाचे विस्तारलेले जाळे हानिकारक ठरत असून, बेरोजगारीची प्रचंड संख्या वाढल्याने राज्यातील महाविद्यालयांच्या विद्यार्थी संख्येत प्रत्येक वर्षाला 25 ते 30 हजाराने घट होत आहे. किंबहुना विद्या र्थ्यांसह विविध कारणांनी तीन वर्षांत राज्यातील 50, तर देशात तब्बल 388 महा विद्यालयांना टाळे लागल्याचे धक्कादाय क वास्तव समोर आले आहे. 

तीन वर्षांत 'इतक्या' व्यावसायिक महाविद्यालयांना टाळे!...धक्कादायक वास्तव

sakal_logo
By
संतोष विंचू : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (येवला) जिल्ह्याच्या ठिकाणीच नव्हे, तर मुंबई- पुण्यासारख्या ठिकाणी आठ-दहा वर्षांपूर्वी मिळणारे शिक्षण आता तालुक्‍याच्या पातळीवर एखाद्या खेडेगावा तही मिळू लागले आहे. मात्र, व्यावसायिक शिक्षणाचे विस्तारलेले जाळे हानिकारक ठरत असून, बेरोजगारीची प्रचंड संख्या वाढल्याने राज्यातील महाविद्यालयांच्या विद्यार्थी संख्येत प्रत्येक वर्षाला 25 ते 30 हजाराने घट होत आहे. किंबहुना विद्या र्थ्यांसह विविध कारणांनी तीन वर्षांत राज्यातील 50, तर देशात तब्बल 388 महा विद्यालयांना टाळे लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 


पाच ते सहा वर्षांत या महाविद्यालयांना हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागतंय

पारंपरिक कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांच्या पलीकडे जाऊन आठ ते दहा वर्षां मध्ये राज्यात व्यावसायिक शिक्षणाचे वारे वाहू वाहत तालुका पातळीपर्यंत अभि यांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली. मात्र, पाच ते सहा वर्षांत या महाविद्या लयांना हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आर्किटेक्‍चर, डिझाइन, अभियांत्रिकी, एमबीए, एमसीए, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, तंत्रनिकेतन आदी महा विद्यालयांना विद्यार्थी शोधण्याची वेळ येऊन विद्यार्थ्यांअभावी कुलूप लावण्याची वेळ आली आहे. 

शेवटी उतरती कळा लागून कुलूप लावण्याची वेळ

गेल्या वर्षी राज्यातील तब्बल 27 तंत्रनिकेतन महाविद्यालयांनी तंत्रशिक्षण संचालना लयाकडे महाविद्यालये बंद करण्यासाठी परवानगी मागितली आहे. दरवर्षी राज्यात साडेतीन ते चार लाख विद्यार्थी व्यावसायिक पदवी घेऊन बाहेर पडतात. मात्र, नोकरी ची सांगड बसत नसल्याने लाखो विद्यार्थी बेरोजगार होत असून, याचमुळे व्याव सायिक अभ्यासक्रमांकडील ओढा कमी होतांना दिसत आहे. स्पर्धेत नामांकित महा विद्यालय तग धरून असले तरी नव्याने सुरू होणाऱ्या महाविद्यालयांना जम बसव तांना विद्यार्थी मिळेनासे होतात आणि शेवटी उतरती कळा लागून कुलूप लावण्याची वेळ येते. 2013 - 14 पासून आतापर्यंत राज्यात 89 महाविद्यालये बंद झाली असून, देशाचा आकडा या काळात 700 पर्यंत पोचला आहे. 

750 कोर्स बंद 

स्पर्धेत अनेक महाविद्यालयांनी गुणवत्ता आणि सुविधांच्या जोरावर तग धरला आहे. तरीही त्यांना वेगवेगळे अभ्यासक्रम (कोर्स) बंद करण्याची वेळ येत आहे. विशेषत: अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील सिव्हिल, इलेक्‍ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन, आयटी अशा कोर्सला मागणी नसल्याने ते बंद केले आहेत. 2016-17 मध्ये राज्यात 205, तर 2017-18 मध्ये सर्वाधिक 391, तर 2018-19 मध्ये 107 कोर्स बंद झाले आहेत. चार वर्षांत हा आकडा 751 वर पोचला आहे. 

हेही वाचा >  PHOTO : खेळता खेळता 'ती' थेट पोहचली अनोळखी रस्त्यावर...अन्

ही आहेत करणे... 

- अभियांत्रिकीच्या पदवीनंतर नोकरीची नसलेली हमी 
- फार्मसीची पदविका व पदवी घेऊन गल्लीबोळात सुरू झालेले मेडिकल 
- दहावीनंतर आयटीआय किंवा द्विलक्षी अभ्यासक्रमाकडे वाढलेला कल 
- बारावीनंतर बीएस्सी, आयटी, बीएएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमाकडील ओढ 
- तंत्रनिकेतन, अभियांत्रिकीच्या पदवीनंतर नोकरी नाही अन्‌ व्यवसायात असलेली प्रचंड स्पर्धा 
- कंपन्यांमध्ये अवघ्या दहा ते पंधरा हजारांची मिळणारी नोकरी 
- बेरोजगार म्हणून भटकण्याची येत असलेली वेळ 
- अनेक महाविद्यालयांकडून भौतिक सुविधांचा अभाव तसेच पुरेशा प्रमाणात नसलेले शिक्षक व सुविधा 


असा आहे राज्याचा लेखाजोखा... 

वर्ष - एकूण - नवीन - बंद - विद्यार्थी 
13-14 - 1520 - 21 - 10 - 462786 
14-15 - 1549 - 42 - 9 - 481673 
15 -16 - 1544 - 34 - 18 - 467729 
16 -17 - 1552 - 40 - 25 - 443347 
17 - 18 - 1563 - 52 - 19 - 420861 
18-19 - 1557 - 62 - 6 - 400275 
19-20 - 1606 - 79 - 2 - 385706 

हेही वाचा > बळीराजासाठी अवकाळी निधी ठरतोय मृगजळ!...शेतकरी हेलपाट्यांनी त्रस्त

अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता देणे बंद केले असून, हे उशिराने सुचलेले शहाणपण आहे. आपल्याकडे अभियंते पदवी घेतात. मात्र, त्यांना नोकरी नाही, बॅंका उद्योगासाठी कर्ज देत नाही, मुद्रा योजना दिखाऊ आहे. इस्राईलची लोकसंख्या तेवढी भारतात अभियंते असले, तरी त्यांना भविष्य काय आहे. - हरीश आडके, प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ  

हेही वाचा > PHOTO : कटला, सुरमई, पापलेट, वाम...अरे वाह! 'इथं' तर माशांची मेजवानीच!...पण, कोरोना?