भुजबळ संतापले...अधिकाऱ्यांना घेतले फैलावर...नेमके काय घडले?

chhaganbhujbal3.jpg
chhaganbhujbal3.jpg

नाशिक : (येवला) येथे कोरोनामुळे आतापर्यंत सहा जणांचा, तर गेल्या तीन दिवसांत चार जणांचा बळी गेल्याने संतापलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. 14) येथे अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. कामातील व दप्तरदिरंगाई अजिबात खपवून घेणार नाही. अधिकाऱ्यांत समन्वय आणि नियोजनाचा अभाव होता कामा नये, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भुजबळ यांनी संपर्क कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई
 
या वेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, प्रांताधिकारी सोपान कासार आदींची प्रमुख उपस्थिती होती. येथे वाढती रुग्णसंख्या बघता तपासणी पथके करून तातडीने डोअर टू डोअर स्क्रीनिंग करावे, सर्व्हे करताना केवळ मलमपट्टी नको तर तपासणीतून प्रत्यक्ष निष्कर्ष द्या अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत लोक आपल्यापर्यंत येण्याअगोदरच त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करावी, तपासणीची संख्या वाढविण्यात येऊन त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाला प्रशिक्षण, पुरेसे सॅनिटायझर, हॅंड ग्लोव्हजसह आवश्‍यक साहित्याचा पुरवठा करावा. लो रिस्क आणि हाय रिस्क रुग्णांचे अहवाल येईपर्यंत त्यांना होम क्वारंटाइनऐवजी इन्स्टिट्यूशनमध्ये क्वारंटाइन करावे आदी सूचना या वेळी त्यांनी दिल्या. 

शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी करावी

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील स्वच्छता, तसेच आवश्‍यक फवारणी करण्यात यावी, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या कामकाजात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरातील गर्दी टाळण्यासाठी दुकानांना वेळ वाढवून द्यावी, तसेच यावर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. गरजू शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्जवाटप करावे, तसेच मका खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येऊन सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी करावी, असे आदेश त्यांनी या वेळी दिले. 

या वेळी पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे, तहसीलदार रोहिदास वारुळे, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पस्वामी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, डॉ. सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक निरीक्षक अनिल भवारी, संदीप कोळी, सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com