गरीब बापाचे पोरांनी पांग फेडले! हातगाडीवर फळे विक्रेत्याची मुलं शासकीय सेवेत; समाजसेवेचा वसा कायम

दीपक खैरनार 
Monday, 5 October 2020

काही परिस्थितीला फाटा देत वरिष्ठ अधिकारीपर्यंत मजल गाठतात तर काहींची अजूनही खालावते. यात हातगाडीवर फळे विकणा-यांची दोन्ही मुलांनी शासकिय खात्यात आपली नावे उंचावल्याने फळ विक्रेत्याचा उर अभिमानाने भरून येत आहे.

अंबासन (जि.नाशिक) : परिस्थिती कोणीची कुठे घेऊन जाईल याबाबत कल्पना न केलेलीच बरी! असे जुन्या जाणकारांकडून म्हटले जाते. काही परिस्थितीला फाटा देत वरिष्ठ अधिकारीपर्यंत मजल गाठतात तर काहींची अजूनही खालावते. यात हातगाडीवर फळे विकणा-यांची दोन्ही मुलांनी शासकिय खात्यात आपली नावे उंचावल्याने फळ विक्रेत्याचा उर अभिमानाने भरून येत आहे.

फळे विकून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह

हातगाडीवर फळे विकणा-यांची दोन्ही मुलांनी महसूल व पोलिस खात्यात आपली नावे उंचावल्याने फळ विक्रेत्याचा उर अभिमानाने भरून येत आहे.सटाणा बस स्थानकावर बाळासाहेब बच्छाव यांनी अतिशय खडतर प्रवासात फळे विकून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत मुलांचे शिक्षण पुर्ण केले. पिंपळगाव बसवंत येथे महसूल कार्यालयात राकेश बच्छाव कार्यरत आहेत तर जायखेडा (ता.बागलाण) येथील पोलिस ठाण्यात रविराज बच्छाव हे कार्यरत असून दोघा भावांनी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवत समाजसेवेचा वसा जपला आहे. रविराज बच्छाव यांना खाकीचे विशेष आकर्षण असल्याने त्यांनी २००७ मध्ये पोलिस भरतीत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.

खाकीतील दर्दी माणूस

मुंबई येथे अनेक वर्षे पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत असतांनाच गरीब व गरजू लोकांची सेवा केली. खाकीतील दर्दी माणूस म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. कालांतराने जायखेडा पोलिस ठाण्यात त्याची नियुक्ती करण्यात आली तिथेही त्यांनी अनेक गरजवंतांना मदतीचा हात दिला आहे. फोपीर येथील मेंढपाळाच्या मुलाचे पहिलीपासून शिक्षण पुर्ण करण्याची जबाबदारी उचलली, अंबासन फाट्यावरील आदिवासी वृध्दाला खाण्यापिण्याची सोय केली, जिल्ह्याच्या सरहद्दीतील आदिवासी पाड्यावर आदिवासी कुटुंबियांची चूल बंद होण्याच्या मार्गावर होती. बच्छाव यांना याबाबत माहिती मिळाताच संपूर्ण कुटुंबियांना किराणा वाटप केले. यामुळे चुली पुन्हा पेटणार होत्या.

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

आणि दगूबाई यांना रडू कोसळले...

दरम्यान दुंधे (ता.मालेगाव) येथील एका कुटुंबियांची वाताहात झाली होती. तिथेही त्यांनी लक्ष केंद्रित करीत कुटुंबियांची जबाबदारी उचलली आणि काही महिन्यात त्या कुटुंबियांसाठी घर बांधण्यात येणार असल्याचे सांगितले. अशा अनेक कुटुंबियांना त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अनेक ठिकाणी मेंढपाळ वस्ती असो किंवा गरीब वस्तीवर जाऊन होतकरू व गरीब मुलांना दप्तर वाटप करून पाट्या पुस्तके वह्या वाटप केली. मालेगाव नामपूर रस्त्यावर माॅर्निंग वाॅकला जात असताना अतिशय निर्जन स्थळी जवळपास साठी ओलांडलेली आदिवासी वृध्द महिला एका छोट्याशा झोपडीत राहत असल्याचे निदर्शनास आले त्यांनी संपूर्ण माहिती काढत बाहेगाव येथील असल्याचे दगूबाई रावजी कुवर असे आहे. परिस्थिती अतिशय बिकट असल्याचे लक्षात येताच त्यांनी साडीचोळी व किराणा पोहच केला. यामुळे दगूबाई यांना रडू कोसळले आणि बच्छाव यांना कवेत घेत मिटी मारून मायेचा हात फिरवला. रविराज बच्छाव यांनी केलेल्या समाजसेवी कामाबाबत अनेक संस्थांनी दखल घेऊन सन्मानित केले आहे.

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Children of fruit seller selected in government service nashik marathi news