esakal | ज्येष्ठ पुन्हा घरात ‘लॉक’! लसीकरण होऊनही बसावे लागते घरात; मानसिकतेवर परिणाम 

बोलून बातमी शोधा

Corona is affecting the mentality of senior citizens who have to stay at home Nashik News

ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षीही कोरोनामुळे कठोर निर्बंध असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस घेऊनही घराबाहेर न पडणे पसंत केले असून, ज्येष्ठ नागरिक घरात लॉक झाले आहेत. 

ज्येष्ठ पुन्हा घरात ‘लॉक’! लसीकरण होऊनही बसावे लागते घरात; मानसिकतेवर परिणाम 
sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : शहरात महिनाभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, यात ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षीही कोरोनामुळे कठोर निर्बंध असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस घेऊनही घराबाहेर न पडणे पसंत केले असून, ज्येष्ठ नागरिक घरात लॉक झाले आहेत. 

कुटुंबातील सदस्यांनी सवांद साधणे महत्त्वाचे..

वर्षभरापासून लहान मुलांची शाळा ऑनलाइनच असल्यामुळे तेही घरातच ‘लॉक’ आहेत. ज्येष्ठ नागरिक घरात गुंतून राहत असल्याने आणि त्यांच्याकडे काही विरंगुळा नसल्याने त्यांच्या मानसिकेतवर परिणाम होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले. दिवाळीपासून कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आल्याने ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक, पर्यटन, मंदिर आदी विरंगुळाच्या गोष्टी सुरू झाल्याने दिलासा मिळाला होता. नाशिकमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनातील स्वयंसेवक समितीत ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी मोठ्या हिरहिरीने सहभाग नोंदविला. सध्या वाढत्या कोरोन संसर्गामुळे प्रत्यक्ष भेटी होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना दुसरा विरंगुळा नसल्याचे दिसते. ज्येष्ठ नागरिकांशी कुटुंबातील सदस्यांनी सवांद साधणे महत्त्वाचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शहरातील विविध मैदाने, उद्यानात रोज सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांची कोरोनाचे नियम पाळत गर्दी होत होती. मात्र, महिनाभरापासून निर्बंध लागल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलेही घरात पुन्हा लॉक झाली आहेत.  

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू