
सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी सिडकोच्या कामटवाडे व डीजीपीनगर भागातील प्रत्येकी एक अशा दोन रुग्णांना बेड मिळत नसल्याची तक्रार करत बुधवारी (ता. ३१) थेट महापालिका मुख्यालयाबाहेर बसविले होते.
विदारक चित्र! कोरोनाबाधिताला बसविले आंदोलनाला; उपचाराविना अखेर मृत्यू
नाशिक : सिडको भागातील दोन कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याने पालिका मुख्यालयासमोर दोन्ही रुग्णांनी ठिय्या दिल्याचा प्रकार बुधवारी (ता. ३१) घडला होता. त्यानंतर आता आंदोलन करणाऱ्या एका रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे.
सामाजिक कार्यकर्ते ढोके यांच्यावर गुन्हा दाखल होणार?
भाऊसाहेब गोळे (वय 39) असे कोरोनाबाधिताचे नाव असून त्या रुग्णाला सार्वजनिक ठिकाणी आंदोलन करायला लावणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते दीपक ढोके यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे समजते. सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी सिडकोच्या कामटवाडे व डीजीपीनगर भागातील प्रत्येकी एक अशा दोन रुग्णांना बेड मिळत नसल्याची तक्रार करत बुधवारी (ता. ३१) थेट महापालिका मुख्यालयाबाहेर बसविले होते. यातील एका रुग्णाने ऑक्सिजन सिलिंडरसह ठिय्या दिला. ऑक्सिमीटरद्वारे रुग्णाची तपासणी केली असताना ३६ टक्के ऑक्सिजन लेव्हल दर्शविली जात असल्याचे डोके यांनी दाखविले. जिल्हा रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यासाठी घेऊन गेल्यानंतर महापालिकेच्या बिटको व झाकिर हुसेन रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तेथेही बेड शिल्लक नसल्याचे उत्तर दिले जात असल्याचा दावा डोके यांनी केला होता.
कोरोना प्रादुर्भाव आणि रुग्णांची स्थिती चव्हाट्यावर
ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या रुग्णाला बुधवारी सायंकाळी महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. (ता.१) एप्रिलला पहाटेच्या सुमारास या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड
कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष
सिडको भागातील दोन कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याने पालिका मुख्यालयासमोर दोन्ही रुग्णांनी ठिय्या दिल्याचा प्रकार बुधवारी (ता. ३१) घडला. दोन्ही रुग्णांना तातडीने नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात रुग्णवाहिकेमधून भरती करण्यात आले. दरम्यान, शहरात सरकारी व खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध असून, ज्यांना बेड मिळत नाही त्यांच्यासाठी पालिकेची हेल्पलाइन असतानाही थेट मुख्यालयात कोरोना रुग्णाला आणण्याच्या प्रकाराया घटनेमुळे शहरातील कोरोना प्रादुर्भाव आणि रुग्णांची स्थिती हा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. बाधितांना बेड मिळत नसल्याची तक्रार यापूर्वीही केली जात होती. मात्र, या घटनेमुळे शहरातील विदारक स्थिती सर्वांसमोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण