CoronaVirus : कोरोनासंबंधी 'ती' पोस्ट टाकणे चांगलीच आली 'त्यांचा' अंगलट!

corona virus.jpg
corona virus.jpg
Updated on

नाशिक : (येवला) काळजी घेण्याची व अफवा न पसरविण्याची सूचना असताना, येवला तालुक्‍यातील दोघांनी कोरोना रुग्ण असल्याबाबत खोटी अफवा पसरवल्याने दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तालुका पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे मोबाईल जप्त केले. 

असा आहे प्रकार

तालुक्‍यातील पाटोदा व ठाणगाव येथे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला असल्याची पोस्ट रायगड ग्रुपचा ऍडमिन हृतिक काळे (वय 19, रा. नागडे, ता. येवला) याने येवल्यातीलच रूपचंद भागवत या व्हाट्‌सऍप ग्रुपवर केली. तसेच त्याचा मित्र कलीम सलीम पठाण (19, रा. निमगाव मढ) यालाही ही पोस्ट पाठवली. या पोस्टमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसमित्रांनी तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना ग्रुपवरील या अफवा असलेल्या पोस्टचे स्क्रीन शॉट पाठवले. त्यावर तत्काळ कारवाई करत घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तालुका पोलिस निरीक्षक भवारी, रघुनाथ सोनवणे, राजेंद्र पाटील, राजेंद्र केदारे, यशवंत गडाख यांनी तत्काळ त्या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर सोशल मीडियावर अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा गुन्हा नोंदविला. तसेच त्यांचे मोबाईलही ताब्यात घेतले आहेत. 

आगाऊपणा त्या दोघांच्या अंगलट

जगभरात कोरोना विषाणूजन्य रोगाने थैमान घातले आहे. सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यात्रा, निवडणुका, बाजार, लग्न, समारंभ रद्द करून गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. सोबतच नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. असे असताना काही उतावीळ तरुण मेसेज फॉरवर्ड करण्याचा धडाकाच लावत आहेत. मात्र, हा आगाऊपणा मंगळवारी (ता.17) दोघांच्या अंगलट आला. 

दरम्यान, कोरोना संवेदनशील आजार असून, नागरिकांनी याकडे गांभीर्याने पाहावे. खोट्या अफवा सोशल मीडियावर पसरवणे, ही बाब अतिशय चुकीची असून, सोशल मीडियावर याबाबत चुकीचे संदेश पसरवू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com