esakal | दहा हजार रुपयांची लाच पोलीस शिपायाला पडली महागात; निलंबनानंतर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

police bribe.jpg

शहर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर जिल्हा पोलिसप्रमुखांनी यापूर्वीच त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

दहा हजार रुपयांची लाच पोलीस शिपायाला पडली महागात; निलंबनानंतर गुन्हा दाखल

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : शहर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर जिल्हा पोलिसप्रमुखांनी यापूर्वीच त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

असा घडला प्रकार

बाभूळगाव येथील दोन गटांतील वादाच्या घटनेत पोलिस शिपाई अतुल सुधाकर फलके यांनी तक्रारदार व त्याच्या वडिलांवर शहर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीवरून सापळापूर्व पथकाने २७ ऑक्टोबरला पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बुधवारी (ता. १८) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

लागोपाठ दोन कारवायांमुळे पोलिस दलात खळबळ

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत फलके यांची चौकशी झाली होती. त्यातील अहवालानुसार जिल्हा पोलिसप्रमुख सचिन पाटील यांनी फलके यांना मागील आठवड्यात निलंबित केले आहे. लागोपाठ दोन कारवायांमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.  

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी