लॉटरी लागल्याचा आनंदच आनंद...अन् क्षणात दु:खाचा डोंगर...

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 15 January 2020

सोमनाथ भिकाजी बिन्नर (वय 26) यांच्या पत्नीच्या मोबाईलवर व्हॉट्‌सऍप कॉल आला. या मोबाईल क्रमांकाला 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे व्हॉट्‌सऍपवरून सांगण्यात आले. त्यानंतर लॉटरीचे प्रमाणपत्रही व्हॉट्‌सऍपवर पाठविल्याने या दांपत्याचा विश्‍वास पटला. यापूर्वी अनेकांना अशा प्रकारे बक्षीस लागल्याचे व्हिडिओ, छायाचित्र त्यांनी या दांपत्याच्या व्हॉट्‌सऍपवर पाठविले. त्यानंतर...

नाशिक : सोमनाथ भिकाजी बिन्नर (वय 26) यांच्या पत्नीच्या मोबाईलवर व्हॉट्‌सऍप कॉल आला. या मोबाईल क्रमांकाला 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे व्हॉट्‌सऍपवरून सांगण्यात आले. त्यानंतर लॉटरीचे प्रमाणपत्रही व्हॉट्‌सऍपवर पाठविल्याने या दांपत्याचा विश्‍वास पटला. यापूर्वी अनेकांना अशा प्रकारे बक्षीस लागल्याचे व्हिडिओ, छायाचित्र त्यांनी या दांपत्याच्या व्हॉट्‌सऍपवर पाठविले. त्यानंतर...

असा घडला प्रकार...

पिंपळे (ता. सिन्नर) येथील सोमनाथ भिकाजी बिन्नर (वय 26) यांच्या पत्नीच्या मोबाईलवर व्हॉट्‌सऍप कॉल आला. या मोबाईल क्रमांकाला 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे व्हॉट्‌सऍपवरून सांगण्यात आले. त्यानंतर लॉटरीचे प्रमाणपत्रही व्हॉट्‌सऍपवर पाठविल्याने या दांपत्याचा विश्‍वास पटला. यापूर्वी अनेकांना अशा प्रकारे बक्षीस लागल्याचे व्हिडिओ, छायाचित्र त्यांनी या दांपत्याच्या व्हॉट्‌सऍपवर पाठविले. बिन्नर दांपत्याला सलग दोन-तीन दिवस याबाबत वेगवेगळी माहिती देत त्यांचा विश्‍वास संपादन केला. या लॉटरीवर शासनाला कर भरावा लागणार असल्याने या करापोटी आपल्याला एक लाख 93 हजार रुपये आगाऊ भरावे लागतील, असेही सांगितले. कराची आगाऊ रक्कम भरताच तुमच्या खात्यावर 25 लाखांची रक्कम जमा होईल, असे सांगितले. यावर विश्‍वास ठेवत बिन्नर यांनी आरटीजीएसद्वारे त्यांनी सांगितलेल्या बॅंक खात्यावर एक लाख 90 हजार रुपये जमा केले. त्याच दिवशी लॉटरीची रक्कम खात्यावर जमा होईल म्हणून सांगितले; परंतु दुसऱ्या दिवशीही बॅंक खात्यावर रक्कम जमा न झाल्याने त्यांनी दिलेल्या नंबरवर फोन केला असता तो मोबाईल बंद येत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. बिन्नर दांपत्याने सिन्नर पोलिस ठाणे गाठून झालेला प्रकार, व्हिडिओ कॉल पोलिसांना दाखविला. सिन्नर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक साहेबराव पाटील, हवालदार शहाजी शिंदे तपास करीत आहेत.  

हेही वाचा > स्टाईलमध्ये लावली 'अशी' पैज...की होऊन बसला आयुष्याशी खेळ!

सिन्नर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल

"तुम्हाला 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे,' असे सांगत व्हिडिओ कॉलद्वारे लॉटरी लागल्याचे प्रमाणपत्र दाखवत एक लाख 90 हजार रुपयांना गंडा घातला. पिंपळे (ता. सिन्नर) येथील दांपत्याची फसवणूक करण्यात आली. याबाबत सिन्नर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > शेजारचाच आवडत होता तिला...शेवटी पतीने..

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: couple lost two lakhs instead of enjoy the lottery Nashik Crime News