मालेगावात मतमोजणीसाठी १६ टेबलची व्यवस्था; प्रशासकीय यंत्रणेकडून चोख नियोजन 

प्रमोद सावंत
Saturday, 16 January 2021

तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.१५) ७७.७३ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले आहे. मतमोजणीसाठी दोन दिवसांची प्रतिक्षा असल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच उमेदवार व त्यांचे समर्थक आकडेमोडीत व्यस्त होते.

मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.१५) ७७.७३ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले आहे. मतमोजणीसाठी दोन दिवसांची प्रतिक्षा असल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच उमेदवार व त्यांचे समर्थक आकडेमोडीत व्यस्त होते. मतमोजणीबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. बहुतांशी ग्रामपंचायतीत दोन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. उमेदवार व त्यांच्या समर्थकांना मतमोजणीची प्रतिक्षा आहे.

तालुक्यात मतदानाची स्थीती

पांढरुण येथे सर्वात जास्त ९६.४६ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. चिंचवे (गा.) येथे सर्वात कमी ४२.१८ टक्के मतदान झाले. ७५ हजार २१८ महिला व ८६ हजार ५५५ पुरुष असे एकूण एक लाख ६२ हजार ४७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (ता.१८) सकाळी दहाला तहसिल कार्यालयात मतमोजणीला सुरवात होईल. मतमोजणीसाठी १६ टेबल लावण्यात आले असून, सहा फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडेल. 

हेही वाचा >  लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

पहिल्या फेरीत १६ टेबलांवर मतमोजणी

पहिल्या फेरीत १६ टेबलांवर १६ ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय मतमोजणी होईल. या ग्रामपंचायतींच्या सर्व प्रभागांची मतमोजणी झाल्यानंतर १६ च्या टप्प्याने उर्वरित ग्रामपंचायतींच्या फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी अल्फाबेट प्रमाणे गावांची क्रमवारी करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलावर तीन या प्रमाणे ४८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एवढेच कर्मचारी राखीव नियुक्त करण्यात आले आहेत. सकाळी दहाला मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर साडेदहाला पहिल्या ग्रामपंचायतीचा संपूर्ण निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे. निकाल ऐकण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ग्रामपंचायत निहाय ध्वनीक्षेपकावरुन निकाल जाहीर केला जाईल. ज्या ग्रामपंचायतींची मतमोजणी असेल अशाच प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार आहे. 

अशी होईल मतमोजणी... 

टेबल क्रमांक - क्रमनिहाय मतमोजणी होणाऱ्या ग्रामपंचायतींची नावे : 
एक - अजंग, देवघट, हिसवाळ, लेंडाणे, राजमाने, वडेल. 
दोन - अस्ताने, डाबली, जळगाव (गा.), मथुरपाडे, रावळगाव, वाके. 
तीन - आघार बुद्रुक, डोंगराळे, जळगाव (नि.), माणके, रौंझाणे, वळवाडे. 
चार - आघार खुर्द, ढवळेश्‍वर, जळकू, मुंगसे, साजवहाळ, वळवाडी. 
पाच - अजंदे, देवारपाडे, जेऊर, मेहुणे, साकुर, वऱ्हाणे. 
सहा - भिलकोट, एरंडगाव, कजवाडे, नागझरी, साकुरी नि., विराणे. 
सात - भारदेनगर, येसगाव बुद्रुक, कंधाणे, नाळे, सावकारवाडी, वनपट. 
आठ - चंदनपुरी, येसगाव खुर्द, कळवाडी, नांदगाव, सवंदगाव, झाडी. 
नऊ - चिखलओहोळ, गरबड, कौळाणे (गा.), नरडाणे, शेंदुर्णी, झोडगे. 
दहा - चिंचगव्हाण, गाळणे, कौळाणे (नि.), निमगाव, शेरुळ, घाणेगाव. 
अकरा - चिंचावड, गारेगाव, कोठरे बुद्रुक, निमगाव खुर्द, सिताणे, लोणवाडे. 
बारा - चिंचवे (गा.), गिलाणे, कुकाणे, निमगुले, तळवाडे, मळगाव. 
तेरा - दहिदी, गिगाव, खडकी, निमशेवडी, टिंगरी, पाथर्डे. 
चौदा - दापुरे, गुगुळवाड, खाकुर्डी, पाडळदे, टेहेरे, सोनज. 
पंधरा - दहिवाळ, घोडेगाव, खलाणे, पांढरुण, टाकळी, सायने खुर्द. 
सोळा - दसाणे, हाताणे, खायदे, पिंपळगाव, वडगाव, उंबरदे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curiosity about the Gram Panchayat election results has reached peak malegaon nashik marathi news