esakal | देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस
sakal

बोलून बातमी शोधा

vaishno devi yatra.jpg

देवदर्शनासाठी वैष्णोदेवीला शेळके गेले होते. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात त्यांचे कार्ड अचानक बंद झाले होते. पण महाराष्ट्रात आल्यानंतर जेव्हा प्रकार लक्षात आला तेव्हा त्यांना धक्का बसला..काय घडले नेमके?

देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

sakal_logo
By
विनोद बेदरकर


नाशिक : देवदर्शनासाठी वैष्णोदेवीला शेळके कुटुंब गेले होते. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात त्यांचे कार्ड अचानक बंद झाले होते. पण महाराष्ट्रात आल्यानंतर जेव्हा प्रकार लक्षात आला तेव्हा त्यांना धक्का बसला..काय घडले नेमके?

देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर

शेळके देवदर्शनासाठी वैष्णोदेवी येथे गेले होते. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात त्यांचे कार्ड बंद झाले होते. महाराष्ट्रात परतताच त्यांनी बँक खात्याची खातरजमा केली असता ही घटना उघडकीस आली. बँक खात्यातून तब्बल १३ लाख रुपयांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ बँकेच्या ग्राहक केंद्राशी संपर्क साधून फसवणुकीची कल्पना दिली. त्यामुळे तीन लाख रुपये परत मिळविण्यात यश आले. मात्र, नऊ लाख ७५ हजारांवर भामट्यांनी डल्ला मारला. ज्यावेळी त्यांचे खाते हॅक झाले, त्या वेळी चोरट्यांनी त्यात काही व्यवहार केले. दुसऱ्या खात्यातील पैसे वर्ग करण्यात आले. त्यानंतर सर्व रक्कम परस्पर काढण्यात आली. निरीक्षक बोरसे तपास करीत आहेत.  

महाराष्ट्रात परतल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार समोर

देवदर्शनासाठी जम्मू काश्मीरला गेलेल्या शहरातील देवी भक्ताच्या बँक खात्यावर सायबर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. महाराष्ट्रात परतल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार समोर आला. दरम्यान, देवी भक्ताने ग्राहक केंद्राशी संपर्क साधल्याने किमान सव्वातीन लाख रुपये वाचले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला. सचिन कोंडाजी शेळके (रा. बोधलेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. हा व्यवहार ऑनलाइन झाला. विशेष म्हणजे भामट्यांनी शेळके यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यात १४ लाखांची रक्कमही जमा केली होती. १२ जानेवारीला त्यांच्या खात्यात एकूण २३ लाख ७५ हजारांची उलाढाल झाली.