"वनी रे वनी... गयी रे गयी..!''...अरे 'इथं' चाललंय तरी काय?

farmar faced to load shedding.jpg
farmar faced to load shedding.jpg

नाशिक : (दाभाडी) सतत ये-जा होणाऱ्या विजेमुळे "वनी रे वनी... गयी रे गयी..!'च्या 
त्रासिक संवादाने दाभाडी पंचक्रोशीतील शिवार गजबजून गेले आहे. शेती सिंचनासाठी मोठ्या कालखंडानंतर उपलब्ध जलसाठ्यातून रब्बीच्या हंगामाच्या संधीचं सोनं करण्याची वेळ आली असतांना वीज भारनियमनाच्या तकलादू वेळपत्रकाने शेतकऱ्यांना रडकुंडीला आणले आहे. 

रब्बीधारक शेतकरीवर्ग वैतागला

वीजपुरवठ्याची वेळ रात्रीची... शिवारात रात्र जागून काढताना त्यात सतत ये-जा होणाऱ्या विजेमुळे "वनी रे वनी... गयी रे गयी..!'च्या त्रासिक संवादाने दाभाडी पंचक्रोशीतील शिवार गजबजून गेले आहे. त्यामुळे पाणी सिंचन पद्धतीचा अवलंब याचा विचार करून भरनियमनाची वेळ ठरवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. भूजल साठ्यात यंदा मोठी वाढ झाल्याने ठिबक सिंचनऐवजी चारी पद्धतीने रब्बी पिकांना पाणी दिले जात आहे. ठिबक सिंचन पद्धतीत वीज उपलब्ध वेळ वीजसंच चालू-बंद कारण्यापुरता असतो. मात्र, चारी पद्धतीने पाणीपुरवठा करताना रात्रभर शेतात उभं राहणं आणि त्यात विजेच्या ये-जा प्रकाराने शेतातील बारे ते दूरवरच्या विहिरीपर्यंत वीज संच चालू करण्यासाठी होणारी पायपीट यामुळे रब्बीधारक शेतकरीवर्ग वैतागला आहे. रात्री वीजपुरवठ्यात बिघाड झाल्यास वीज कर्मचारी उपलब्ध नसतात. एका विहिरीवर अनेकांची वाटेदारी असलेल्यांचे वेळापत्रक कोलमडून पडते. गहू पिकावरील रात्रीचे दव ऐन थंडीत शेतात उभं राहणं मुश्‍कील करत असताना विजेच्या रात्रीच्या आणि त्यात ये-जा होणाऱ्या पुरवठ्याने अवघ्या रब्बीच्या शिवारात शेतकऱ्यांना हाल सोसावे लागत आहे. 

अडचणी समजून घेतल्याशिवाय वेळापत्रक लादू नका

शहरी आणि ग्रामीण भाग अशा दोन सीमांवर शेती करणाऱ्यांना नव्या वेळापत्रकाने जर्जर केले आहे. वेळापत्रक निश्‍चित करतांना शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी. आमच्या अडचणी समजून घेतल्याशिवाय वेळापत्रक लादू नका. - भिकन निकम, शेतकरी, दाभाडी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com