ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

माणिक देसाई
Monday, 1 February 2021

आजकाल प्रसिध्दीसाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. एका  शेतकरी कामगाराच्या मुलाने उसतोडणी सुरू असताना चक्क स्वत:च्या मृत्यूलाच आमंत्रण दिल्याचं चित्र समोर आले आहे. काय घडले नेमके? 

निफाड (जि.नाशिक) : आजकाल प्रसिध्दीसाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. एका  शेतकरी कामगाराच्या मुलाने उसतोडणी सुरू असताना चक्क स्वत:च्या मृत्यूलाच आमंत्रण दिल्याचं चित्र समोर आले आहे. काय घडले नेमके? 

ही स्टंटबाजी कि वेडेपणा?

गोदाकाठ परिसरातील कुरुडगाव शिवारात ऊस तोडणी चालु असताना बिबट्याचे बछडे आढळले. मात्र ऊस तोडणी कामगारांच्या पोरांनी या बछड्याला उचलून घेत यासोबत सेल्फी काढण्यासाठी आपले मोबाईल बाहेर काढून फोटोसेशन केले.  मात्र यावेळी परिसरात बिबट्याची मादी देखील होती. फोटोसेशन झाल्यानंतर या बिबट्याच्या बछड्यांना पुन्हा ऊस तोडणी कामगारांनी मादीकडे सोडून दिले. आता ही हिम्मत म्हणावी कि वेडेपणा हे तुम्हीच ठरवा..

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

स्वतःवर आवर घालायला हवा

असले तरी आपला जीव धोक्यात घालून बिबट्याच्या बछड्या बरोबर सेल्फी काढणाऱ्यांनी स्वतःवर आवर घालायला हवा अन्यथा विपरीत घडायला वेळ लागणार नाही असे वन विभागाचे सुनील महाले यांनी बोलताना सांगितले आहे.

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous selfie with leopard nifad nashik marathi news