
तालुक्यातील शहा येथील तरुण एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. दिवाळीनंतर तो थोडे दिवस घरी आला होता. त्यानंतर तो परत जाण्यास निघाला. मात्र तो कामावर पोहचलाच नाही. तीन दिवसानंतर तो सापडला मात्र मृतवस्थेतच...वाचा काय घडले नेमके?
खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय
नाशिक : (सिन्नर) तालुक्यातील शहा येथील तरुण एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. दिवाळीनंतर तो थोडे दिवस घरी आला होता. त्यानंतर तो परत जाण्यास निघाला. मात्र तो कामावर पोहचलाच नाही. तीन दिवसानंतर तो सापडला मात्र मृतवस्थेतच...वाचा काय घडले नेमके?
अशी आहे घटना
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्सा तरुणाचा मृतदेह पाण्याच्या खाणीत फक्त अंतर्वस्त्रात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नितीन अरुण गुंजाळ (वय 28) हा सिन्नरला एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होता. दिवाळीनंतर काही दिवस घरी थांबल्यानंतर शुक्रवारी (ता. 27) आई, वडील व भावाने त्याला कामावर जाण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर जेवण करून घराबाहेर पडलेला नितीन बेपत्ता झाला होता. रविवारी (ता. 29) दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहा-पंचाळे रस्त्यालगत असणार्या पाण्याच्या खाणीत त्याचा मृतदेह आढळल्यावर संभाजी जाधव यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. पंचनामा केल्यावर दोडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आला.
अंगावरील कपडे गायब...
नितीन शुक्रवारी (ता. 27) घराबाहेर पडला त्यावेळी त्याच्या अंगावर असणारे कपडे आढळून आले नाहीत. केवळ बनियन व अंडर पॅन्ट एवढेच अंतर्वस्त्र त्याच्या अंगावर होते. तर त्याचे बूट व मोबाईल फोनही परिसरात मिळून आला नाही. अवघ्या चार फूट खोल पाण्यात एखाद्याचा जीव जाऊच कसा शकतो? हा प्रश्न उपस्थित झाला असून त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता बळावली आहे. मृत नितीनच्या चेहऱ्यावर व मानेजवळ मारहाणीच्या खुणा असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली
दिवाळीपूर्वी झाली होती मारहाण
दोन आठवड्यांपूर्वी दुचाकीवरून घरी येत असतांना एक चारचाकी वाहन आडवे लावून अज्ञात तरुणांनी नितीनचा रस्ता आडवला होता. पुतळेवाडी फाट्यानजीक हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी त्याला मारहाण करण्यात आली. मात्र, पाठीमागून येणाऱ्या स्थानिक तरुणांना पाहून मारहाण करणारे पळून गेले होते अशी माहिती संभाजी जाधव यांनी दैनिक सकाळला दिली.
हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार
Web Title: Dead Body Youth Who Had Been Missing 3 Days Was Found Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..