पदविका अभ्यासक्रमांच्या  प्रवेशासाठी आता 'या' तारखेपर्यंत मुदत; वाचा सविस्तर 

अरुण मलाणी
Wednesday, 26 August 2020

इयत्ता दहावीनंतर पदविका अभियांत्रिकी (डिप्‍लोमा), औषध निर्माणशास्‍त्र शाखेतील पदविका, हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी अभ्यासक्रमाच्‍या पदविकांसाठी प्रवेश अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्‍यानुसार आता विद्यार्थ्यांना ४ सप्‍टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

नाशिक : इयत्ता दहावीनंतर पदविका अभियांत्रिकी (डिप्‍लोमा), औषध निर्माणशास्‍त्र शाखेतील पदविका, हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी अभ्यासक्रमाच्‍या पदविकांसाठी प्रवेश अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्‍यानुसार आता विद्यार्थ्यांना ४ सप्‍टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

मुदतवाढीचा तंत्रशिक्षण संचालनालयाचा निर्णय 

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे हा निर्णय घेण्यात आला. इयत्ता दहावीनंतर तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) येथे पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमास, तसेच इयत्ता बारावीनंतर औषधनिर्माणशास्‍त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी अशा विषयांमध्ये पदविका अभ्यासक्रमास प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. अद्याप अर्ज न केलेल्‍या विद्यार्थ्यांना आता ४ सप्‍टेंबरपर्यंत अर्ज करता येईल. नोंदणी करून अर्ज भरल्‍यानंतर विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीचे दोन पर्याय उपलब्‍ध आहेत. ई-स्क्रूटिनी व प्रत्‍यक्ष सुविधा केंद्रावर जाऊन स्‍क्रूटिनी विद्यार्थ्यांना ४ सप्‍टेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे. तात्‍पुरती गुणवत्तायादी आता ८ सप्‍टेंबरऐवजी १० सप्‍टेंबरला जाहीर केली जाणार आहे. 
 

हेही वाचा > संजीवनीदायक मालेगावच्या काढ्यामुळे 'अवघड जागेचं दुखणं' वाढतंय? वाचा डॉक्टरांचे मत​

कौशल्‍याधिष्ठित पदविका अभ्यासक्रमांतून विद्यार्थ्यांना करिअरच्‍या चांगल्‍या संधी उपलब्‍ध आहेत. नोकरी, व्‍यवसायाचे पर्याय उपलब्‍ध असल्‍याने विद्यार्थ्यांनी या पर्यायांचा विचार केला पाहिजे. सध्याच्‍या परिस्‍थितीत कुठलाही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, याकरिता अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली असून, या मुदतीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. -डी. पी. नाठे, सहसंचालक (डीटीई) तथा प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन  
 

हेही वाचा > ''पोलिस आयुक्त साहेब..पीएफच्या फाईलवर सही करा नाहीतर आत्महत्या'' पोलिस कर्मचाऱ्याने थेट कंट्रोललाच सांगितली आपबिती

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deadline for admission to diploma courses nashik marathi news