'आधी माहीत असतं तर तुला मी पाठवलंच नसतं!'...असं म्हणत आईने फोडला हंबरडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

कुंदलगाव (ता. चांदवड) येथे सोमवारी (ता. 24) सकाळी मुलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. अवघे वय वर्ष 15 असलेल्या अल्पवयीन गायत्रीवर काळाने घाला केला. याबाबत चांदवड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

नाशिक / दरेगाव : कुंदलगाव (ता. चांदवड) येथे सोमवारी (ता. 24) सकाळी मुलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. अवघे वय वर्ष 15 असलेल्या अल्पवयीन गायत्रीवर काळाने घाला केला. याबाबत चांदवड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

अशी घडली घटना

कुंदलगाव येथील निमोण शिवारात कडनोर वस्ती या ठिकाणी राहणारे ज्ञानेश्‍वर कडनोर यांची मुलगी गायत्री ज्ञानेश्‍वर कडनोर (वय 15) घरातील पाणी भरण्यासाठी जवळच असलेल्या गट क्रमांक 253 मधील विहिरीवर सकाळी साडेनऊला वीजपंप सुरू करण्यासाठी गेली असता वीजपंपात प्रवाह उतरल्याने त्याचा जोरदार धक्का बसला. गायत्रीला बसलेला विजेचा धक्का इतका मोठा प्रमाणात होता की त्यामुळे ती जमिनीवर कोसळली. तिला घरच्यांसह गावकऱ्यांनी उपचारासाठी मनमाड येथे नेले. परंतू, सगळे प्रयत्न अपयशी ठरले. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता डॉक्‍टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. याबाबत चांदवड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

हेही वाचा > चार महिन्यांच्या गर्भवतीला सांगितले.."काहीही कर..पैसे आण"...ग्रामस्थांचा कॅंडलमार्च..

गायत्री जनता विद्यालयात नववीत शिक्षण घेत होती. राजेंद्र गिडगे यांनी या घटनेची माहिती चांदवड पोलिस ठाण्यात दिली असता चांदवड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.

हेही वाचा > हसत खेळत चिमुकली पाण्याच्या टबजवळ गेली...अन् थोड्या वेळातच भयाण शांतता! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death of a girl student in Kundalgaon due to electric shock nashik marathi news