esakal | धक्कादायक! 'या' तंत्रज्ञानामुळे फेकन्यूज ओळखणंही होणार अवघड..कारण..
sakal

बोलून बातमी शोधा

fake news 1.jpg

दिल्लीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्याच्या प्रचारामध्ये दिल्ली भाजपकडून डीपफेक या तंत्रज्ञानाचा वापर करून काही व्हिडिओमध्ये रचनेत प्रसारित करण्यात आल्याची माहिती एका अहवालातून पुढे आली आहे. डीपफेक व्हिडिओचे नवे आव्हान पुढील काळात देशातील निवडणूक प्रचारात असणार आहे, हे सुद्धा या अहवालात नमूद केले आहे. दरम्यान, या अहवालात हे व्हिडिओ तयार करताना दिल्ली भाजपकडून कोणताही गैरप्रकार झालेला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पण हे तंत्रज्ञान निश्चितच भविष्यात आव्हान निर्माण करणार असल्याचे म्हटले आहे.

धक्कादायक! 'या' तंत्रज्ञानामुळे फेकन्यूज ओळखणंही होणार अवघड..कारण..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिल्लीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्याच्या प्रचारामध्ये दिल्ली भाजपकडून डीपफेक या तंत्रज्ञानाचा वापर करून काही व्हिडिओमध्ये रचनेत प्रसारित करण्यात आल्याची माहिती एका अहवालातून पुढे आली आहे. डीपफेक व्हिडिओचे नवे आव्हान पुढील काळात देशातील निवडणूक प्रचारात असणार आहे, हे सुद्धा या अहवालात नमूद केले आहे. दरम्यान, या अहवालात हे व्हिडिओ तयार करताना दिल्ली भाजपकडून कोणताही गैरप्रकार झालेला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पण हे तंत्रज्ञान निश्चितच भविष्यात आव्हान निर्माण करणार असल्याचे म्हटले आहे.

डीपफेक वापरून पक्षाचे नेते व खासदार मनोज तिवारी यांचे दोन व्हिडिओ व्हायरल..
व्हाईसने (Vice) हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, दिल्ली भाजपकडून एका कंपनीशी करार करण्यात आला होता. या कंपनीने डीपफेक तंत्रज्ञान वापरून पक्षाचे नेते आणि खासदार मनोज तिवारी यांचे दोन व्हिडिओ तयार केले. या व्हिडिओमध्ये मनोज तिवारी हरयाणवी आणि इंग्रजीमध्ये बोलताना दिसतात. मनोज तिवारी यांच्या हिंदीतील भाषणांवरूनच हे व्हिडिओ तयार करण्यात आले. हे व्हिडिओ इतके सफाईदारपणे तयार करण्यात आले की मनोज तिवारी हरयाणवी आणि इंग्रजीमध्ये व्यवस्थित बोलत आहेत असे वाटते. पण ते डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आल्याचे व्हाईसने म्हटले आहे.

कोणताही गैरप्रकार झालेला नाही.. भाजपकडून स्पष्ट
दिल्ली भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, कंपनीने अशा स्वरुपाचा कोणताही करार कोणत्याही कंपनीशी केला नव्हता. आमच्याकडे वेगवेगळ्या कंपन्या आल्या आणि त्यांनी त्यांची प्रचारासंदर्भातील विविध उत्पादने दाखविली. त्यावेळी आमच्या टीममधील एका सदस्याकडे एक व्हिडिओ आला होता. त्यामध्ये मनोज तिवारी हरयाणवी भाषेत भाषण देत असल्याचे दाखवले होते. आमच्यापैकी काहींना असे वाटले की हा व्हिडिओ इंग्रजीतही असायला हवा. त्यामुळे आम्ही इंग्रजीतील व्हिडिओची मागणी एका कंपनीकडे केली. त्या कंपनीने आम्हाला तो व्हिडिओ त्या पद्धतीने तयार करून दिला. हे तंत्रज्ञान सकारात्मकपणे वापरले तर त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो, असेही या नेत्याने सांगितले.

डीपफेक व्हिडिओ म्हणजे काय?
डीपफेक हे एक तंत्रज्ञान आहे. या माध्यमातून ऑडिओ आणि व्हिडिओ तयार करता येतात. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापरून हे व्हिडिओ तयार केले जातात. हे व्हिडिओ पू्र्णपणे कल्पनारम्य स्वरुपाचे असतात. पण त्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचे वेगळ्या पद्धतीने चित्रण दाखवता येऊ शकते. त्या व्यक्तीने कधीच न बोललेले शब्द किंवा वाक्य या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या तोंडी दाखवता येऊ शकतात. सामान्य प्रेक्षकांसाठी किंवा श्रोत्यांना डीपफेक व्हिडिओ ओळखणे अवघड असते

हेही वाचा > भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये "फलकयुद्ध'..महापालिका प्रशासन दोन हात दूर 

सायबर फोरन्सिक एक्सपर्ट म्हणतात...

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये विविध प्रकारचे अपडेशन सतत चालू असते त्याचनुसार विविध सॉफ्टवेअरच्या कॉम्बिनेशननी मशीन लर्निंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा अत्याधुनिक वापर करून चेहरा हा ओळखला जाऊ शकतो. चेहऱ्याचे विविध हावभाव, फोटो काढून ते त्याच्या बोलण्याच्या वेगवेगळ्या शब्दांनुसार बनावट ऑडिओ अन् व्हिडिओनुसार तयार करून असे बनावट व्हिडीओ तयार केले जाऊ शकतात. अशा प्रकारचे व्हिडिओ बघून कोणी पण त्याच्यावरती पटकन विश्वास ठेवू शकतो.आपल्याला दाखवले जाणारे प्रत्येक व्हिडीओ हे खरेच आहे असा विश्वास ठेवणे चुकीचे आहे. इंटरनेटवरील सर्व जण ते चांगले असतात असे नाही. पण असे व्हिडिओ जर सायबर फोरन्सिक एक्सपर्टकडे आले तर हे बनावट व्हिडिओ तर ओळखण्यास फार वेळ लागत नाही - तन्मय दीक्षित, सायबर फॉरेन्सिक तज्ञ

हेही वाचा > ..."तर शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार होईल"  - इंदुरीकर​