VIDEO : विठुरायाच्या दर्शनाची आस...नाथांच्या पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 30 जून 2020

सकाळी प्रस्थानापूर्वी त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात कीर्तन आणि भजनं गात नाथांच्या चांदीच्या प्रतिमेची आणि पादुकांचं विधिवत पूजन करण्यात आलं. त्यानंतर त्र्यंबकेश्वरमधील पवित्र कुशावर्तात नाथांच्या पादुकांना स्नान घालण्यात येऊन विधिवत पूजा करण्यात आली. आणि परंपरेप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे दर्शन घेऊन नाथांच्या पादुका पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाल्यात. नाथांच्या पादुका रात्री मुक्कामी पंढरपूरला पोहचतील.

नाशिक : आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी संत निवृत्तीनाथांच्या पादुकांनी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीनं न जाता या पादुका शिवशाही बसमधून पंढरपूरला नेण्यात येतायत. या पादुकांसोबत पंढरपूरला जाण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर विश्वस्त मंडळाचे सदस्य, विणेकरी, ध्वजकरी, टाळकरी आणि व्यवस्थापकांसह केवळ 20 जणांनाचं परवानगी देण्यात आलीय.

सकाळी प्रस्थानापूर्वी त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात कीर्तन आणि भजनं गात नाथांच्या चांदीच्या प्रतिमेची आणि पादुकांचं विधिवत पूजन करण्यात आलं. त्यानंतर त्र्यंबकेश्वरमधील पवित्र कुशावर्तात नाथांच्या पादुकांना स्नान घालण्यात येऊन विधिवत पूजा करण्यात आली. आणि परंपरेप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे दर्शन घेऊन नाथांच्या पादुका पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाल्यात. नाथांच्या पादुका रात्री मुक्कामी पंढरपूरला पोहचतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Departure of Nivrutti nath footsteps towards Pandharpur nashik marathi news