esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

simple wedding 1.png

कोरोना रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत असल्याने त्यात सहभागी होण्याच्या उद्देशाने माजी आमदार जयवंत जाधव, ऍड. नितीन ठाकरे, ऍड. महेश सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी आवारे यांना विनंती करत गर्दी कमी करण्याचे आवाहन केले. त्याला आवारे कुटुंबीयांनी प्रतिसाद देत नातेवाईक, मित्रमंडळींना घरातूनच अक्षदारूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले. त्यानुसार छोटेखानी कार्यक्रमात विवाह सोहळा झाला.

#COVID19 : गर्दी नको..अन् नको तो कोरोना! लग्नाच्या गाठी बांधून आटोपला घरगुती विवाह सोहळा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एरवी कुठल्याही एखाद्या विषयावर मतभेद असले, तरी ज्यावेळी राष्ट्रावर संकट येते, त्या वेळी सर्वजण एकत्र येतात. हा नेहमीचा अनुभव कोरोनाच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर येत आहे. माजी आमदार वसंत गिते, युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष नितीन सुंगधी व ऍड. चंद्रकांत आवारे यांच्या कुटुंबांनी विवाह सोहळ्याला गर्दी होऊ नये म्हणून विवाहाचे कार्यक्रम घरगुती स्वरूपातच आटोपून सामाजिक भान जपले. 

गर्दी टाळून आटोपले घरगुती विवाह सोहळे..कुटुंबीयांकडून सामाजिक भान 
वसंत गिते यांचे पुतणे व सुनील गिते यांचे पुत्र आदित्य यांचा विवाह सोहळा आडगाव नाका येथील लंडन पॅलेस येथे गुरुवारी (ता.19) झाला. परंतु कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर शासनपातळीवर गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात असताना विवाहानिमित्तही गर्दी होणार असल्याने गिते कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रमंडळींना एसएमएस, भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत वधू-वरांना घरातूनच आशीर्वाद देण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला सर्वांनीच प्रतिसाद दिला. कुटुंबातील मोजक्‍या लोकांसमवेत छोटेखानी विवाह सोहळा झाला. युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष नितीन सुगंधी यांची कन्या आर्किटेक्‍ट ज्यूली हिच्या विवाहानिमित्त सोमेश्‍वर लॉन्स येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम झाला. गर्दी टाळण्यासाठी वधू-वराकडील कुटुंबीयांसमवेत पूजाविधी करून विवाह सोहळा झाला. 

हेही वाचा > धक्कादायक! आंघोळीसाठी 'तीघी' तलावात उतरल्या...अन् थोड्या वेळाने मृतदेहच पडले बाहेर..

राष्ट्रवादीचा सामाजिक संदेश 
ऍड. चंद्रकांत आवारे यांची कन्या पूजा हिचा विवाह सोहळा गुरुवारी इंदू लॉन्स येथे होता. कोरोना रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत असल्याने त्यात सहभागी होण्याच्या उद्देशाने माजी आमदार जयवंत जाधव, ऍड. नितीन ठाकरे, ऍड. महेश सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी आवारे यांना विनंती करत गर्दी कमी करण्याचे आवाहन केले. त्याला आवारे कुटुंबीयांनी प्रतिसाद देत नातेवाईक, मित्रमंडळींना घरातूनच अक्षदारूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले. त्यानुसार छोटेखानी कार्यक्रमात विवाह सोहळा झाला.

हेही वाचा > दहावीतला मुलगा पेपरच्या आदल्या दिवशीच मित्रासह पळाला....रेल्वे स्टेशनहून दोघांची खबर आली की..

go to top