नागरिकांनो..लॉकडाऊनमध्ये रेशनिंगसाठी 'या' हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करा..अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे आवाहन

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 11 एप्रिल 2020

लॉकडाऊन कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन बाबतीत जनतेत जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे.  रेशनिंगसाठीच्या तक्रारीसाठी किंवा रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करा किंवा ईमेल अथवा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदवा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे जनतेस करण्यात आले आहे. 

नाशिक :  कोरोना साथरोग नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे. जनतेने रेशनिंग संदर्भातील तक्रारी आणि माहिती मिळविण्यासाठी 1800224950 किंवा 1967 या नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन

लॉकडाऊन कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन बाबतीत जनतेत जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे.  रेशनिंगसाठीच्या तक्रारीसाठी किंवा रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करा किंवा ईमेल अथवा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदवा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे जनतेस करण्यात आले आहे. 

हेही वाचा > BREAKING : मालेगावातील कोरोना पॉझिटिव्ह 22 वर्षीय तरुणीचा धुळ्यात मृत्यू.. कोरोनाचा दुसरा बळी सुद्धा मालेगावातूनच

राज्यस्तरीय हेल्पलाईन ही सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहणार असून त्याचा हेल्पलाईन क्रमांक : 1800 22 4950/1967 (नि:शुल्क) आहे. अन्य हेल्पलाईन क्रमांक : 022- 23720582 / 23722970 / 23722483, ईमेल- helpline.mhpds@gov.in,ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी mahafood.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले असून हा कक्ष सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहील. त्याचा हेल्पलाईन क्रमांक- 022-22852814,ईमेल- dycor.ho.mum@gov.in असा आहे.

हेही वाचा > BREAKING : कोरोना झाल्याच्या भीतीने तरुणाची आत्महत्या...नाशिकमधील धक्कादायक घटना 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: During the lockdown period a helpline operated for rationing in the state nashik marathi news