धक्कादायक : कॅन्टोन्मेंट यादीतून 11 टक्के मतदारांना डच्चू

Cantonment Board.jpg
Cantonment Board.jpg

नाशिक : कॅन्टोन्मेंट यादीतून 11 टक्के मतदारांना डच्चू सर्वोच्च न्यायालयाने 2016 ला दिलेल्या एका आदेशानुसार देशातील सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये 2017 पासून मतदार यादी बनविताना सरकारी जागेवर अतिक्रमण केलेल्या तसेच बांधकाम आरखडा मंजूर न करता घरे बांधणाऱ्या नागरिकांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे यंदा देवळाली कॅम्प बोर्डाच्या यादीतून तब्बल 4 हजार 62 मतदारांना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी 35 हजार 105 मतदार असलेल्या देवळालीत यंदा 31 हजार 43 इतकेच मतदार पात्र असणार आहेत. 

कॅन्टोनमेंट निवडणूक कायदा 2007 कलम 12 नुसार घरोघरी जाऊन मतदारांचे सर्वेक्षण करून 1 जुलैला यादी प्रसिद्ध केली जाते मतदार यादीवर आक्षेप घेण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी देउन बोर्डाचे अध्यक्ष समिती नेमून हरकतीवर सुनावणी घेतात. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होते. नव्या यादीनुसार, सर्वाधिक दोन हजार 699 मतदारांची नावे प्रभाग सातमध्ये कमी झाले आहेत. गेल्या निवडणूकीत 4 हजार 498 इतके मतदार असलेल्या या प्रभागात यंदा एक हजार 799 मतदार राहिले आहेत. 

2022 पर्यंत निवडणूक लांबणीवर? 
कॅन्टोन्मेंट कायद्यात दुरुस्तीसाठी देशभरात प्रक्रिया सुरू आहे, यासाठी संरक्षण विभागाच्या प्रशासकीय कार्यालयाने सूचना मागविल्या होत्या. आता कॅन्टोन्मेंट कायद्यातच लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात बदल केला जाणार आहे. त्यात कॅन्टोन्मेंट हद्दीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क, थेट उपाध्यक्ष निवडणूक, चटई क्षेत्रात बदल, आरक्षण आदी महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करण्यात आला आहे. ही प्रक्रिया  पूर्ण होण्यासाठी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे देशातील कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका 2022 पर्यत लांबण्याची चिन्हे आहेत.

अनेकांची उडाली झोप
एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांची संख्या घटल्याने अनेक इच्छूकांची झोप उडाली आहे. अनेकांनी वर्षापासून निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. आता अंतिम यादीत मतदारच घटल्याने निवडणूकीचा हक्क डावलला जात असल्याची तक्रार करीत, लोकप्रतिनिधी व इच्छूकांच्या शिष्टमंडळानी प्रशासकीय यंत्रणेचे उंबरे झिजवायला सुरुवात केली आहे.

संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या अखत्यारीत व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया राबविली आहे. 
अक्षेप आहे ते कायद्यातील तरतुदीनुसार बोर्ड अध्यक्षांकडे दाद मागू शकतात. 
अजय कुमार (मुख्य कार्यकारी अधिकारी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com