'सुशिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक खपवून घेणार नाही' - IGP डॉ. प्रतापराव दिघावकर

प्रमोद सावंत
Sunday, 4 October 2020

सुशिक्षित बेरोजगार तरुणांची नोकरीच्या निमित्ताने पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्यांना वठणीवर आणू, असे प्रतिपादन करतानच नाशिक परिक्षेत्रातून गुटखा हद्दपार होईलच, असा विश्‍वास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी शनिवारी (ता.३) येथे व्यक्त केला. 

नाशिक : (मालेगाव) छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या राज्याला प्राधान्य दिले. यात रयत राजा आहे. त्यांच्या पोलिसांकडून काही अपेक्षा आहेत. त्यांच्या सेवेत आम्ही तत्पर असतो. शेतकरी कष्टात राबतो. त्याच्या भाजीच्या देठाला हात लावलेले खपवून घेणार नाही. सुशिक्षित बेरोजगार तरुणांची नोकरीच्या निमित्ताने पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्यांना वठणीवर आणू, असे प्रतिपादन करतानच नाशिक परिक्षेत्रातून गुटखा हद्दपार होईलच, असा विश्‍वास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी शनिवारी (ता.३) येथे व्यक्त केला. 

प्रमुख उपस्थिती...

कसमादे भूमिपुत्र नागरी गौरव समितीच्या सत्काराला उत्तर देताना डॉ. दिघावकर बोलत होते. कृषिमंत्री दादा भुसे अध्यक्षस्थानी होते. आमदार मौलाना मुफ्ती, ‘मविप्र’चे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, बंडूकाका बच्छाव, प्रसाद हिरे, उपमहापौर नीलेश आहेर, बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव, भिकन शेळके, शांताराम लाठर, नितीन पोफळे, सखाराम घोडके, जिल्हा परिषद सदस्य जे. डी. हिरे, अरुण देवरे, नगरसेवक मदन गायकवाड, डॉ. जयंत पवार, राजेंद्र भामरे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा >  ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

डॉ. दिघावकर यांचा सत्कार

समितीतर्फे मानपत्र देऊन डॉ. दिघावकर यांचा सत्कार झाला. निमंत्रक दीपक पवार यांनी प्रास्ताविक केले. शेतकऱ्यांतर्फे मुन्ना पवार यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. भुसे, श्री. बच्छाव, श्री. हिरे, पवन ठाकरे आदींची भाषणे झाली. अरुण पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. शिशिर हिरे, दादा जाधव, किशोर कदम, विवेक वारुळे, बाळासाहेब शिरसाठ, समाधान साळुंखे, राजेंद्र लोंढे, धर्मराज पवार, मनोज हिरे, सतीश पाटील, राजेंद्र देवरे यांच्यासह गौरव समितीचे सदस्य, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र दिघे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक देसले यांनी आभार मानले.  

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Educated unemployed youth will not tolerate cheating - Pratap Dighavkar nashik marathi news