एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

विनोद बेदरकर
Sunday, 4 October 2020

ऑनलाइन वाईन मागवत असाल तर सावधान...ऑनलाइन वाईन घेण्याची हौस चांगलीच गळ्याशी आली आहे. नाशिकरोड एका ज्येष्ठाला एक वाईनची बाटली चक्क १ लाख १८ हजार रुपयांना पडली. आता ते खरेदी करतांना चार वेळा विचार करणार. काय घडले नेमके वाचा...

नाशिक : ऑनलाइन वाईन मागवत असाल तर सावधान...ऑनलाइन वाईन घेण्याची हौस चांगलीच गळ्याशी आली आहे. नाशिकरोड एका ज्येष्ठाला एक वाईनची बाटली चक्क १ लाख १८ हजार रुपयांना पडली. आता ते खरेदी करतांना चार वेळा विचार करणार. काय घडले नेमके वाचा...

अशी आहे घटना

ऑनलाइन वाईन मागविणे एका ज्येष्ठाला चांगलेच महागात पडले. ऑनलाइन एक वाईनची बाटली मागवल्यानंतर त्यांचे बँक खाते हॅक करून भामट्याने वेळोवेळी त्यांच्या खात्यातून १ लाख १८ हजार ४५७ रुपये लंपास केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी प्रशांत गोविंद घाटनेकर (६४, रा. ग्रिन मिडोस अपार्टमेंट, म्हसोबा मंदिराजवळ, नाशिक रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार घाटनेकर यांनी १२ सप्टेंबरला त्यांनी घरून ऑनलाइन वाईनची बाटली मागवली होती. या बाटलीची रक्कम भरण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे घाटनेकर यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती दिली. त्यावरून भामट्यांनी त्यांचे एचडीएफसी बँकेचे खाते हॅक करून वेळोवेळी आतापर्यंत १ लाख १८ हजार रुपये लंपास केल्याचे उघडकीस आले. 

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

संबंधित व्यक्तीने वेळोवेळी प्रशांत घाटनेकर यांच्या खात्यातून आतापर्यंत १ लाख १८ हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले तपास करीत आहे. 

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elderly fraud in online shopping nashik marathi news