पाच वर्षांत  पहिल्यांदा शेवटच्या आवर्तनानंतरही चणकापूरमध्ये पाणी शिल्लक 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

मालेगाव, ता. 13 ः कसमादेसाठी वरदान ठरलेले चणकापूर धरण शेतकऱ्यांसाठी यंदा चांगलेच लाभदायी ठरले. दशकानंतर धरणातून सिंचनासाठी दोन आवर्तने मिळाली. पिण्यासाठीचे शेवटचे आवर्तन येत्या दोन-तीन दिवसांत सोडले जाऊ शकेल. धरणात 643 दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. मालेगावसह विविध पाणीपुरवठा योजनांमध्ये निम्मा जलसाठा शिल्लक आहे. शिवाय नदीपात्र ओले असल्याने आवर्तनासाठी पाणी कमी लागू शकेल. शेवटच्या आवर्तनानंतरही धरणात अडीचशे ते तीनशे दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहणार आहे. नियोजित आवर्तने संपूर्ण धरणात पाणी शिल्लक राहण्याची पाच वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल. 

पाच वर्षांत  पहिल्यांदा
शेवटच्या आवर्तनानंतरही चणकापूरमध्ये पाणी शिल्लक 
सकाळ वृत्तसेवा 
मालेगाव, ता. 13 ः कसमादेसाठी वरदान ठरलेले चणकापूर धरण शेतकऱ्यांसाठी यंदा चांगलेच लाभदायी ठरले. दशकानंतर धरणातून सिंचनासाठी दोन आवर्तने मिळाली. पिण्यासाठीचे शेवटचे आवर्तन येत्या दोन-तीन दिवसांत सोडले जाऊ शकेल. धरणात 643 दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. मालेगावसह विविध पाणीपुरवठा योजनांमध्ये निम्मा जलसाठा शिल्लक आहे. शिवाय नदीपात्र ओले असल्याने आवर्तनासाठी पाणी कमी लागू शकेल. शेवटच्या आवर्तनानंतरही धरणात अडीचशे ते तीनशे दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहणार आहे. नियोजित आवर्तने संपूर्ण धरणात पाणी शिल्लक राहण्याची पाच वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल. 

चणकापूर धरणावर कसमादेतील मालेगावसह लहान-मोठ्या 52 पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नोव्हेंबरपर्यंत पूरपाणी पाणीपुरवठा योजनांना मिळत राहिले. त्यामुळे धरणातील पहिले आवर्तन सोडण्याची गरज फेब्रुवारीलाच पडली. यामुळे आवर्तनांची संख्या चारवरून तीनवर आली. 

सलग दोन संयुक्त आवर्तने 
धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने फेब्रुवारी व एप्रिलमध्ये सोडण्यात आलेली दोन्ही आवर्तने पिण्यासाठी व शेतीसाठी असे संयुक्त होते. याचा फायदा लाभ क्षेत्रातील शेतीला झाला. दोन आवर्तनांमुळे रब्बीचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली. दहा वर्षांत सिंचनासाठी दोन आवर्तने मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. एप्रिलमध्ये सोडण्यात आलेले आवर्तन पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधीचे होते. त्यावेळी सर्व पाणीपुरवठा योजनांचे साठवण तलाव व विहिरी भरून घेण्यात आल्या. 45 दिवस पूर्ण होत आल्याने तिसरे व अखेरचे आवर्तन सोडण्याची तयारी सुरू आहे. 

पाणी शिल्लक राहील 
मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे साठवण तलावात 35 दशलक्ष घनफूट, तर दाभाडीसह बारा गाव योजनेच्या तलावातही निम्मा जलसाठा आहे. शिवाय गिरणा नदीपात्र ओले आहे. त्यामुळे आवर्तनाला 300 ते 350 दशलक्ष घनफूट एवढेच पाणी लागेल. सर्व आवर्तने संपल्यानंतर धरणात अडीचशे ते तीनशे दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहील. तीन वर्षांपासून शेवटच्या आवर्तनांतर धरण कोरडेठाक पडले होते. पाणी शिल्लक राहणार असल्याने यंदा धरण लवकर भरण्यास मदत होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even after the last cycle for the first time in five years, water remains in Chanakapur