
मालेगाव कॅम्प, (जि. नाशिक ) : राज्यातील कोविडची स्थिती व अनेक भागातील वाढत्या तापमानाची परिस्थिती लक्षात घेऊन दहावी-बारावीच्या वार्षिक परीक्षा सकाळी लवकर म्हणजे आठला घ्यावी, अशी विनंती शिक्षक भारतीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
कोविडमुळे परीक्षा एप्रिल-मे मध्ये
बारावी व दहावीच्या परीक्षा अनुक्रमे २३ एप्रिल व २९ एप्रिलपासून होणार आहेत. दर वर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या या परीक्षा कोविडमुळे एप्रिल-मेमध्ये होत आहेत. राज्यभर एप्रिल-मेमध्ये कडक उन्हाळा असतो. राज्यातील अनेक ठिकाणचे तापमान ४० अंशापेक्षा जास्त असते. प्रचंड उकाड्यात पेपर लिहिताना शारीरिक त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. मालेगाव, धुळे, जळगाव, विदर्भ या भागात आज ४२ अंशावर तापमान पोचले आहे.
ग्रामीण भागात विज आणि पंख्यांचा अभाव
ग्रामीण भागातील अनेक शाळा व परीक्षा केंद्रावर पंख्याचा अभाव असतो. ऐनवेळी वीज गायब होते. पत्र्याच्या खोलीत प्रचंड उकाड्याने विद्यार्थी घामाघूम होतात. दरम्यान, अजून पंधरा दिवसांनी प्रचंड उष्णता बघता वेळ सकाळ सत्रात ठेवण्याची गरज आहे. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या नंबर गुणांवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत सकाळी लवकर परीक्षा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बारावी, दहावीच्या परीक्षांच्या पेपरची वेळ बदलणेबाबत शिक्षक भारती संघटनेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र दिल्याची माहिती शिक्षक भारतीचे राज्यकार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे यांना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.