मुंबईवारी पडली महागात..आता आठ दिवस बसा घरीच..!

lockdown 3.jpg
lockdown 3.jpg

नाशिक / सिन्नर : येथील नगरपालिका सभागृहात मंगळवारी (ता.30) दुपारी तीनला कोरोना संसर्गाबाबत उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे, प्रांत अर्चना पाठारे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, तहसिलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी संजय केदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. बी. रसेडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निर्मला गायकवाड, गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुके आदी उपस्थित होते. 


कर्मचाऱ्यांचे स्क्रिनिंग गरजेचे 
श्रीमती बनसोड म्हणाल्या, ग्रामपंचायत स्तरावर फ्लेक्‍स बोर्डव्दारे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करावी, गावात दवंडी देवुन सर्वांनी मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे व दैनंदिन जीवनात वावरताना सोशल डिस्टेंस ठेवणे याबाबत सरपंच, ग्रामसेवक यांनी प्राधान्याने जनजागृती करावी. तालुक्‍यात दोन औद्योगीक वसाहतीत बाहेरुन येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांचे स्क्रिनिंग करावे. लेबर कॉन्ट्रॅक्‍टर यांचेमार्फत कंत्राटी कामगार नेमणुक करताना त्यांची कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने तपासणी होणे आवश्‍यक आहे. याबाबत संबंधित एमआयडीसीला सुचना देण्यात याव्यात. 


खासगी डॉक्‍टर्सची यादी बनवा 
तालुक्‍यात शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची संख्या कमी असल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखणेसाठी शहरातील व ग्रामीण भागातील सर्व खासगी डॉक्‍टर यांची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी त्या सर्वांची यादी तयार करुन व्ही. सी. व्दारे मिटींग लावण्यात येवुन अवगत करावे. जेणेकरुन सर्वांना प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सुचना देण्यात येतील. तसेच आयुर्वेदिक, युनानी, ऍलोपॅथी व विटामीन सी व डी यांचा वापर करुन कोरोनाचा प्रभाव कमी करावा, असे आवाहन त्यांनी केले. 


उद्यापासुन ज्येष्ठांची तपासणी 
खासगी डॉक्‍टरांकडे आलेल्या रुग्णास कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा ग्रामीण रुग्णालय यांना कळवावे, त्यासाठी खासगी डॉक्‍टरांना सुचना देण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहरातील मधुमेह, श्वसनाचे त्रास, उच्च रक्तदाब असलेल्या तसेच वय वर्षे 60 वरील नागरीकांची उद्यापासुन तपासणी केली जाणार असुन आवश्‍यक त्या मार्गदर्शक सुचना व उपाययोजना करण्यात येतील. सिन्नर ग्रामीणमधील वरील नागरीकांची तपासणी पुर्ण झालेली आहे. 


लवकरच रक्त व इतर तपासण्या 
अति जोखमीच्या व्यक्तींची तपासणी व नोंदणी करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पॅथालॉजी लॅब सुरु करण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार झालेला असल्याचे सांगत रक्त नमुने व इतर तपासण्या लवकरच सुरु करण्यात येतील, असेही श्रीमती बनसोड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com