"मामा.. तुमची मुलगी मला देऊन टाका अन् काय हवयं ते घ्या"...लग्नाळू तरुणांनी आर्त हाक.

प्रमोद बोरसे : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

अवकाळी अतिवृष्टी यात भरडला गेलेला शेतकरी तसेच बेरोजगारी मजुरांची असलेली बिकट परिस्थिती, अशा एक ना अनेक कारणांमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या पोरांना मुली देणे शेतकऱ्यांकडून देखील टाळले जात आहे. यामुळे मामाच्या मुलीकडेच अनेकांची धाव असल्याचे दिसून येत आहे. जे काही असेल ते होईल. परंतु मामा तुमची मुलगी मला देऊन टाका अशीच आर्त हाक आता लग्नाळू मुलांकडून कडून व्यक्त होत आहे.

नाशिक : (वडनेर) "मामा तुमनी पोर माले दी टाका..! काय लेवान होई ते ली टाका" .. हीच भावना आता तरुणांच्या मनातून व्यक्त होत आहे. सध्या लग्नाळू मुलांची संख्या अधिक आहे तर मुलींची संख्या कमी असल्याचे सांगितले जाते. यातच दुष्काळी परिस्थिती कोरडवाहू शेतीची झालेली वाईट अवस्था...

शेतमजुरांच्या पोरांना मुली देणे शेतकऱ्यांकडून टाळलं जातय.

अवकाळी अतिवृष्टी यात भरडला गेलेला शेतकरी तसेच बेरोजगारी मजुरांची असलेली बिकट परिस्थिती, अशा एक ना अनेक कारणांमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या पोरांना मुली देणे शेतकऱ्यांकडून देखील टाळले जात आहे. यामुळे मामाच्या मुलीकडेच अनेकांची धाव असल्याचे दिसून येत आहे. जे काही असेल ते होईल. परंतु मामा तुमची मुलगी मला देऊन टाका अशीच आर्त हाक आता लग्नाळू मुलांकडून कडून व्यक्त होत आहे.

सर्वच क्षेत्रात मुली अग्रेसर

मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले असून सर्वच क्षेत्रात मुली अग्रेसर दिसुन येत आहेत. ही आता मुलींच्या बाजूने जमेची बाजू आहे. यामुळे मुलींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत म्हणून चांगल्या शिक्षण झालेल्या व नोकरी व व्यावसायिक मुलांकडे लग्नासाठी बघितले जात आहे. तसेच मुली आपल्या बरोबरीचे शिक्षण किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण असलेल्या मुलांची लग्न करण्यासाठी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कमी शिक्षण झालेला मुलांना लग्नासाठी अनादी अडचणींचा सामना करावा लागत आहे.गेल्या चार ते पाच वर्षापासून दुष्काळसदृश परिस्थिती यामुळे कसमादे परिसरात अनेक विवाह रखडली आहेत. अनेक तरुणांची लग्न रखडली आहेत. यातच सध्या पावसाळा पर्जन्यमान चांगले झाल्याने सर्वत्र चांगले वातावरण आहे. यामुळे यंदा अपेक्षा उंचावल्या असून, मुलगी मिळण्यासाठी मामाच्या मुलीकडे धाव तरुणांची असू शकणार आहे. यामुळे अहिराणी गीतातील ओळींचा प्रत्यय आता नागरिकांना प्रत्यक्ष येत आहे. मामा तुम्ही पोर माले दि टाका...! काय लेवान तर ली टाका... असेच काही परिस्थिती निर्माण झाली आहे.

रुणांकडून सप्तरंगी आयुष्याची स्वप्न रंगवली जात असली तरी...

इंदुरीकर यांच्या कीर्तनातील उदाहरणांचा सत्यता अनुभवत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. मामाच्या विनवण्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले जाते.अनेक तरुणांकडून सप्तरंगी आयुष्याची स्वप्न रंगवली जातात असली, तरी यासाठी अनेकअडचणींची शर्यत पार करावी लागत आहे. काहींनी लग्नासाठी मुलगी मिळत नाही यामुळे परराज्यातील परजिल्ह्यातील मुलींची लग्न करण्यासाठी तयारी दर्शविली जात आहे. तर यासाठी लाखो रुपये खर्च आला तरी तयारी काहींची आहे यामुळे कधी बोलल्यावर चढेल हीच अपेक्षा रखडलेल्या लग्नाळू तरुणांकडून व्यक्त होत आहे.अनेक वयाची तिशी पार केलेल्या तरुणांचे लग्न रखडल्याने वेगळ्या विवंचनेत तरुण गेल्याने अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा विपरीत परिणाम कुटुंबव्यवस्थेवर पडताना दिसत आहे. यंदा तरी चांगल्या प्रमाणात लग्न होतील अशी अपेक्षा तरी व्यक्त होत आहे.

मामा तुमची मुलगी राजवंशी जाई जुई जशी शेवंती....

अनेक जणांकडून बोहल्यावर चढण्याची स्वप्न रंगवली जात आहे. सप्तरंगी आयुष्याला कधी सुरुवात होईल याकडे अनेक तरुणांचे लक्ष लागले आहे. यामुळे नाही मिळणार दुसरी तर आपल्या मामाची पोरगी जरी मिळाली तरी अच्छे दिन आलेत असेच समजा... अशी परिस्थिती आहे. यामुळे तरुण आता मामांकडे लक्ष केंद्रित केले आहे यामुळे अहिराणी गीतातील ओळींचा प्रत्यय आता प्रत्यक्ष येत असल्याचे सांगितले जात आहे. मामा तुमची मुलगी राजवंशी जाई जुई जशी शेवंती.... असे म्हणण्याची वेळ आता लग्नाळू तरुणांवर आली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers young boys desperate for their wedding in village Nashik Marathi News