
नाशिक : (मनमाड) अखेर ते प्रशिक्षणार्थी परतले स्वगृही..."साहेब, आम्हाला परत घरी आणा'' म्हणत तमिळनाडूतील 15 प्रशिक्षणार्थी यांनी पालकमंत्र्यांकडे मदतीची भावनिक साद दिली होता. याला प्रतिसाद देत अखेर मंगळवारी (ता.12) पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांनी विशेष प्रयत्न करून प्रशासकीय पातळीवर हालचाली करून विद्यार्थ्यांना आणण्याची व्यवस्था केली. विद्यार्थ्यांच्या घरवापसीमुळे पालक आनंदित झाले आहेत.
मुलांना समोर पाहताच पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू
रेल्वेच्या ऍप्रेंटिसशिपसाठी तमिळनाडू, कर्नाटकात गेलेले राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 15 प्रशिक्षणार्थी लॉकडाउनमुळे अडकून पडले होते. ऑनलाइन अर्ज करूनही तेथील प्रशासन दाद देत नव्हते. याबाबत "सकाळ'मध्ये "साहेब, आम्हाला परत घरी आणा' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांनी विशेष प्रयत्न करून प्रशासकीय पातळीवर हालचाली करून विद्यार्थ्यांना आणण्याची व्यवस्था केली. अखेर तमिळनाडू बसने मनमाड शहरातील 15 विद्यार्थी मिरजपर्यंत आले. तेथून जळगावला आले. नाशिक जिल्ह्यात येण्यास विद्यार्थ्यांना अडविले असता, श्री. भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक महेश पैठणकर यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळविल्यानंतर मंगळवारी सकाळी सर्व विद्यार्थी जळगावहून मनमाडला दाखल झाले. आपल्या मुलांना समोर पाहताच त्यांच्या पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी पालकमंत्री छगन भुजबळ, "सकाळ' माध्यम समूह आणि प्रशासनाचे आभार मानले.
14 दिवस होम क्वारंटाइन
तमिळनाडूमधून मनमाडमध्ये परतलेल्या विद्यार्थ्यांची येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना 14 दिवस होम क्वारंटाइन केले आहे.
अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न
तमिळनाडू, कर्नाटकमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असून, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे मंगळवारी 15 विद्यार्थी आपल्या घरी आले. या ठिकाणी अडकून पडलेल्या इतर विद्यार्थ्यांनाही परत आणण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ प्रयत्नशील असून, त्यांना आणण्यासाठी परवानगी काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उर्वरित विद्यार्थी लवकरच घरी येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा > दारू दुकाने उघडता, मग मंदिरांची दारे बंद का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.