तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वस्तीवर पोहचली वीज; घराघरात आनंदोत्सवच

गौरव परदेशी
Sunday, 4 October 2020

गावापासून अर्धा किलोमीटर ५० ते ६० लोकसंख्येच्या परिसरात वीज पन्नास वर्षांपूर्वी वितरित झाली होती. मात्र दुर्लक्षामुळे पन्नास वर्षांपासून येथील लोक अंधारातच राहतात. तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच वीजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांत समाधान व्यक्त केलं जात आहे.

नाशिक/खेडभैरव : खेड (ता. इगतपुरी) येथील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड पाचमधील 'पारधी वस्ती'त शुक्रवारी (ता.२) प्रथमच विजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांची जणू दिवाळी साजरी केली. गावापासून अर्धा किलोमीटर ५० ते ६० लोकसंख्येच्या परिसरात वीज पन्नास वर्षांपूर्वी वितरित झाली होती. मात्र दुर्लक्षामुळे पन्नास वर्षांपासून येथील लोक अंधारातच राहतात. तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच वीजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांत समाधान व्यक्त केलं जात आहे.

आमदारांच्या पाठपुराव्याला यश

पारधी वस्तीवरील नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर ॲड. कोकाटे यांनी महावितरणला कळविल्याने पारधी वस्तीवर वीज पोचली आणि शुक्रवारी वस्तीवर आनंद फुलला. वर्षानुवर्षे अंधारात राहणाऱ्या नागरिकांच्या वस्तीवर वीज आल्याने शुक्रवारी जणू पारधी वस्तीवर पन्नास वर्षांनंतर दिवाळीच अवतरली होती. पन्नास वर्षांपासून येथील रहिवासी असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विजेअभावी येणारी अडचण दूर होणार आहे व विजेमुळे आता येथील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणेही सुलभ होणार असल्याने येथील विद्यार्थीही आपल्या घरी विजेचे दिवे चमकल्याने आनंदात आहे, असे हिरामण पारधी यांनी सांगितले.  

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

गेल्या पन्नास वर्षांपूर्वीच वीज पोहचली होती. मात्र आमच्या वस्तीवर महावितरणच्या दुर्लक्षामुळे वीज नव्हती आम्ही वेळोवेळी शासन दरबारी व लोकप्रतिनिधींकडे मागणी करूनही दखल घेतली जात नव्हती. यासंदर्भात आमदार कोकाटे यांच्याकडे मागणी केली होती. - हिरामण पारधी, रहिवासी, पारधी वस्ती

हेही वाचा >   ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty years later, electricity came to Khed nashik marathi news