धक्कादायक! कोरोनाचे चार संशयित क्वारंटाइन रुग्ण इगतपुरीतून फरार..आरोग्य पथक 'त्यांच्या' मागावर!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

इगतपुरी येथील एका कुटुंबील चार जण काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात गेले होतं. ते परत आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइनसाठी सूचित करण्यात आलं होतं. मात्र, ते आता फरार झाले आहेत. आरोग्य पथक त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 52 वर पोहोचली आहे. नाशिकमध्ये 43 संशयित आढळून आले होते. दिलासादायक बाब म्हणजे, यातील 34 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

नाशिक/इगतपुरी  : परदेशातून आलेले आणि कोरोना व्हायरसचे चार संशयित रुग्ण नाशिकच्या इगतपुरी येथून फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमधील आरोग्य पथक त्यांच्या मागावर असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येत आहे.

चार जण काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात.. 

इगतपुरी येथील एका कुटुंबील चार जण काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात गेले होतं. ते परत आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइनसाठी सूचित करण्यात आलं होतं. मात्र, ते आता फरार झाले आहेत. आरोग्य पथक त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 52 वर पोहोचली आहे. नाशिकमध्ये 43 संशयित आढळून आले होते. दिलासादायक बाब म्हणजे, यातील 34 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

रुग्ण विशेष कक्षात निरीक्षणाखाली - जिल्हाधिकारी
नाशिकमध्ये 20 देशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. एकूण 43 जण संशयित म्हणून त्यांच्यावर कोरोना कक्षात उपचार करण्यात आले. यातील 43 पैकी 34 संशयितांचा अहवाल आला असून हे 34 जण निगेटिव्ह आढळून आले आहे. तर इतर 9 रुग्णांना विशेष कोरोना कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. या 9 रुग्णांचा तपासणी अहवाल येणे अजून बाकी आहे. या कक्षातील 34 संशयितांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनासोबत स्वाईन फ्ल्यूचे 2 रुग्णही या विशेष कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four suspected Quarantine patients escaped from Igatpuri Nashik Marathi news